Join us

India vs Australia : रोहित शर्माचा 'हा' पराक्रम तुम्हाला माहिती आहे का...

गेल्या दहा एकदिवसीय मालिकांमध्ये रोहितचा फॉर्म चांगला राहिलेला आहे. कारण त्याच्या धावांमधून तर तेच दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 19:16 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: रोहित शर्मा हा सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पण तो फक्त याच मालिकेत फॉर्मात नाही, तर गेल्या दहा एकदिवसीय मालिकांमध्ये रोहितचा फॉर्म चांगला राहिलेला आहे. कारण त्याच्या धावांमधून तर तेच दिसत आहे.

रोहित गेल्या दोन वर्षांपासून 10 मालिकांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे. रोहितने या दहा मालिकांमध्ये एक नवा पराक्रम केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहित गेल्या दहापैकी प्रत्येक मालिकेमध्ये शतक झळकावल्याचे समोर आले आहे. 2017 साली त्याने श्रीलंकेविरुद्ध द्विशतक झळकावले होते. त्यानंतर प्रत्येक मालिकेत त्याने शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियातील मालिकेमधील पहिल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले होते.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया