Join us  

Sorry Australia!; डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीसाठी पत्नीनं मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय कारण

ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का बसला तो डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) दुखापतीचा... दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरच्या मांडिचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावं लागलं.

By स्वदेश घाणेकर | Published: December 02, 2020 9:33 AM

Open in App

India vs Australia : यजमान ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. तिसऱ्या सामन्यात त्यांनी चार बदल करताना प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का बसला तो डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) दुखापतीचा... दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरच्या मांडिचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावं लागलं. इतकंच नव्हे तर त्यानं मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या वन डेत व ट्वेंटी-20 मालिकेत वॉर्नरशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. कसोटी मालिकेतही पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे. अशात वॉर्नरच्या या दुखापतीला आपण जबाबदार असल्याचे मत त्याची पत्नी कॅनडीस वॉर्नरनं व्यक्त करून ऑस्ट्रेलियाची माफी मागितली आहे. अर्थात तिनं मस्करी केली आहे. 

दुसऱ्या वन डे सामन्यात शिखर धवननं मारलेला फटका अडवताना वॉर्नरला दुखापत झाली आणि तो त्वरित स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये गेला. तो आता रिहॅब सेंटरमध्ये आहे आणि १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतही त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. वॉर्नरच्या जागी ट्वेंटी-20 संघात डी'आर्सी शॉर्टचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल २०२०नंतर UAEहून परतल्यानंतर वॉर्नरला १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत रहावे लागले होते. जवळपास चार महिने वॉर्नर क्रिकेटमध्ये व्यग्र होता आणि तो कुटुंबीयांना भेटला नव्हता. पण, काही दिवसांपूर्वी त्याला कुटुंबीयांना भेटता आले. इभ्रत वाचवण्यासाठी टीम इंडियानं केले चार मोठे बदल, टी नटराजनचे पदार्पण

Triple M's Moonman शी बोलताना कॅनडीस म्हणाली,''सॉरी ऑस्ट्रेलिया!'' वॉर्नरच्या दुखापतीला केवळ क्रिकेटच कारणीभूत नाही, तर भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्यांनी सेक्स केलं आणि त्यामुळे असं झाल्याची, हिंट तिनं दिली.   वॉर्नर पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तंदुरुस्त होईल, असा विश्वासही तिनं व्यक्त केला. वॉर्नरनं पहिल्या वन डे सामन्यात ७६ चेंडूंत ६९ धावा केल्या, तर दुसऱ्या वन डेत ७७ चेंडूंत ८३ धावा केल्या.    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नर