Join us

IND vs AUS: प्रशासकीय समितीची व्हॉट्सअॅपवरून कोहलीला ताकीद, सबुरीनं वाग!

India vs Australia : बीसीसीआय पाठोपाठ प्रशासकीय समितीनेही विराट कोहलीचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 16:56 IST

Open in App
ठळक मुद्दे'देश सोडून जा' हे उत्तर विराट कोहलीला महागात पडलेबीसीसीआयनंतर प्रशासकीय समितीनेही कान टोचले21 नोव्हेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात

मुंबई : चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना 'देश सोडण्याचा' सल्ला देणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली वादात अडकला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) त्याची चांगलीच कानउघडणी केली होती. यातून धडा घेत प्रशासकीय समितीने कोहलीला ताकीद दिली असल्याचे समजते. प्रसारमाध्यम आणि चाहत्यांशी नम्रतेने वागण्याचा सल्ला प्रशासकीय समितीने त्याला दिला आहे. 

(विराट कोहली म्हणतो, मी माफी मागणार नाही...)

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. 21 नोव्हेंबरला ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. मालिकेला रवाना होण्यापूर्वी प्रशासकीय समितीच्या एका सदस्याने कोहलीशी व्हॉट्सअॅपवर चर्चा केली आणि त्याला प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेने वाग, अशी ताकीद देण्यात आली आहे. भारतीय कर्णधारपदाला साजेसे वर्तन कर, असा सल्लाही समितीने दिला. 

कोहलीने यावर काय उत्तर दिले हे अद्याप कळू शकलेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी एक पत्रकार परीषद झाली. या परीषदेमध्ये त्याला 'देश सोडण्याच्या विधानाबाबत विचारले होते. त्यावर कोहली म्हणाला की, " मी याप्रकरणी यापूर्वीच माझे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे आता माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. " 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीबीसीसीआय