Join us  

India vs Australia : टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दिसणार नव्या जर्सीत 

इंडियन प्रीमिअर लीगनंतर ( IPL 2020) टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, तीन वन डे व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 3:45 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगनंतर ( IPL 2020) टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, तीन वन डे व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याची परतफेड करण्यासाठी यावेळी ऑस्ट्रेलियन संघानं कंबर कसली आहे. टीम इंडियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नव्या जर्सीचं अनावरण केलं. या Indigenous Australians जर्सीतून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून          ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया