Join us

India vs Australia: नवीन वर्षात शंभर टक्के यश मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक

2018 साली ऑस्ट्रेलियाला 18 पैकी फक्त दोनच एकदिवसीय सामने जिंकता आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:07 IST

Open in App

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना मंगळवारी रंगणार आहे. या सामन्याच जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर ते मालिका जिंकू शकतात. पण दुसऱ्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा हा तिसरा विजय ठरू शकतो.

ऑस्ट्रेलियाने 2017 साली पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय 4-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन ब्रेनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. या प्रकरणानंतर मात्र ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये लय सापडली नाही. 2018 साली ऑस्ट्रेलियाला 18 पैकी फक्त दोनच एकदिवसीय सामने जिंकता आले होते. आता या वर्षाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने दणक्यात केली आहे. त्यामुळे या वर्षात शंभर टक्के यश मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया