Join us

India vs Australia : मानहानिकारक पराभवानंतर संघ व्यवस्थापनानं अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना खडसावलं

India vs Australia : कर्णधार विराट कोहली मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 21, 2020 16:12 IST

Open in App

India vs Australia : अॅडलेड कसोटीत भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला.  पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांदणे दाखवले. अवघ्या ३६ धावांवर टीम इंडियाचा दुसरा डाव त्यांनी गुंडाळला. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहात टीम इंडियावर प्रथमच अशी नामुष्की ओढावली.  

कर्णधार विराट कोहली मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत. विराटच्या जागी लोकेश राहुल शर्यतीत आहे. त्याव्यतिरिक्त पृथ्वी शॉ, वृद्धीमान सहा व हनुमा विहारी यांच्याजागी अनुक्रमे शुबमन गिल, रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या नावाची चर्चा आहे. शमीनं दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घेतली आहे आणि त्याच्या जागीत मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी यांची नावे चर्चेत आहेत. पृथ्वी शॉला संघाबाहेर करा, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला

२६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी संघ व्यवस्थापनानं अजिंक्य आणि चेतेश्वर पुजारा यांना खडसावणारा मॅसेज पाठवला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार ही दोघं वरिष्ठ खेळाडू दुसऱ्या डावात खाते न उघडता माघारी परतले होते आणि त्यामुळे आता दोघांनी जबाबदारीनं खेळायला हवं आणि संघासाठी योगदान द्यायला हवं, असं सूत्रांनी सांगितले.  मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुजाराचा फॉर्म हरवलेला आहे, रहाणे मागील काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशई ठरत आहे. त्यात आता रहाणेच्या खांद्यावर नेतृत्वाची मोठी जबाबदारी येणार आहे.   'बॉक्सिंग डे' कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणार विशेष पदक 

पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलला संधी मिळणे अपेक्षित आहे. मयांक अग्रवालसह तो सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. मधल्या फळीत विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे. त्याच्यासाथीला चेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे ही जोडी... हनुमा विहारीनेही निराश केले आहे आणि त्यामुळे त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी फिट आहे. सहाच्या जागी रिषभ पंतचा पर्याय आहे, पण सहालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा