India vs Australia, 2nd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणार विशेष पदक; जाणून घ्या कारण

India vs Australia, 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 21, 2020 10:44 AM2020-12-21T10:44:37+5:302020-12-21T10:45:13+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 2nd Test : Man Of The Match winner of Boxing Day Test match will be awarded with the Mullagh Medal | India vs Australia, 2nd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणार विशेष पदक; जाणून घ्या कारण

India vs Australia, 2nd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणार विशेष पदक; जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया पुनरागमन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार हे निश्चित आहे. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या कसोटीतील मॅन ऑफ दी मॅच विजेत्या खेळाडूला एका विशेष पदकानं सन्मानिक करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत  मॅन ऑफ दी मॅच विजेत्या खेळाडूला जॉनी मुलाघ मेडल देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यातील संघाचे मुलाघ हे कर्णधार होते आणि त्यांना मानवंदना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

१८६८मध्ये मुलाघ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा दौरा केला होता. ''बॉक्सिंग डे कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूला मुलाग मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. १८६८च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यातील संघाचे कर्णधारपद मुलाघ यांनी भूषविले होते आणि त्यांना स्मरणार्थ हा मेडल देण्यात येणार आहे,''असे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितले.


मुलाघ यांनी Indigenous संघाचे नेतृत्वा सांभाळले आणि त्यांनी ४५ सामन्यांत ७१ डावांमध्ये १६९८ धावा केल्या. त्यांनी एकूण १८७७ षटकं टाकली आणि त्यापैकी ८३१ षटकं ही निर्धाव दिली. त्यांच्यानावावर २५७ विकेट्स आहेत. त्यांनी पार्ट टाईम यष्टिरक्षणही केलं आणि त्यात त्यांनी चार स्टम्पिंग केले. 
 

Web Title: India vs Australia, 2nd Test : Man Of The Match winner of Boxing Day Test match will be awarded with the Mullagh Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.