India vs Australia, 4th Test : तुमची ही झुंज कायम लक्षात राहील; टीम इंडियासाठी सुनील गावस्करांचा खास Video

India vs Australia, 4th Test : विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आली. त्यात अॅडलेडवरील मानहानिकारक पराभवाच्या जखमा ताज्या होत्याच

By स्वदेश घाणेकर | Published: January 19, 2021 09:13 AM2021-01-19T09:13:28+5:302021-01-19T09:14:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 4th Test : Sunil Gavaskar pays tribute to Ajinkya Rahane & Co., Watch Video | India vs Australia, 4th Test : तुमची ही झुंज कायम लक्षात राहील; टीम इंडियासाठी सुनील गावस्करांचा खास Video

India vs Australia, 4th Test : तुमची ही झुंज कायम लक्षात राहील; टीम इंडियासाठी सुनील गावस्करांचा खास Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवसात लढा कायम ठेवला आहे. पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर ज्या पद्धतीनं टीम इंडियानं संघर्ष दिला, त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत असताना मर्यादित खेळाडूंसह टीम इंडियानं तगड्या ऑस्ट्रेलियाला झुंजवले. भारतानं ही मालिका १-१ अशी बरोबरी रोखून मोठं यशचं मिळवलं आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीचा निकाल काही लागला तरी टीम इंडियाची झुंज कायम लक्षात राहील. 

 विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आली. त्यात अॅडलेडवरील मानहानिकारक पराभवाच्या जखमा ताज्या होत्याच. विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर निर्भेळ यश मिळवेल, अशी भविष्यवाणी केली गेली. पण, टीम इंडियानं लढाऊ वृत्ती, जिद्द आणि चिकाटी दाखवून मालिकेत जबरदस्त कमबॅक केले. त्यांच्या या जिद्दीचं महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी कौतुक केलं. त्यांनी टीम इंडियासाठी विशेष व्हिडीओ तयार केला आहे.

पाहा व्हिडीओ..  


चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियानं पहाटेच रोहित शर्माची विकेट गमावली. पण, शुबमन गिल व चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. गिल ९१ धावांवर माघारी परतला. 

Web Title: India vs Australia, 4th Test : Sunil Gavaskar pays tribute to Ajinkya Rahane & Co., Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.