Join us  

India vs Australia, 4th Test : अजिंक्य, हे तू काय केलंस!; कॅप्टनची चूक टीम इंडियाला पडली महागात, Video

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल पुकोव्हस्कीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मार्कस हॅरीससह डेव्हिड वॉर्नर सलामीला आला. पण, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर या दोघांनी ऑसींच्या सलामीवीरांना माघारी पाठवले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 15, 2021 11:28 AM

Open in App

India vs Australia, 4th Test :  अनुनभवी गोलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियानं चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला तुल्यबळ टक्कर दिली. डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड यांना माघारी पाठवून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्यातील चुरस कायम राखली. सामन्यावरील टीम इंडियाची पकड अधिक घट्ट झाली असती, जर कर्णधार अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) ती चूक केली नसती. अजिंक्यच्या त्या एका चूकीचा टीम इंडियाला जबरदस्त फटका बसताना पाहायला मिळत आहे.  

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल पुकोव्हस्कीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मार्कस हॅरीससह डेव्हिड वॉर्नर सलामीला आला. पण, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर या दोघांनी ऑसींच्या सलामीवीरांना माघारी पाठवले. वॉर्नर पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर ९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ठाकूरनं ऑसींना दुसरा धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन ही सेट जोडी वॉशिंग्टन सुंदरनं तोडली.  स्मिथ व लाबुशेन ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. या जोडीनं १५६ चेंडू खेळून काढताना ७० धावांची भागीदारी केली.

लाबुशेन ३७ धावांवर असताना नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर अजिंक्यनं झेल टाकला. त्यानंतर ४८ धावांवर असताना चेतेश्वर पुजारानं स्लीपमध्ये लाबुशेनला जीवदान दिलं. अजिंक्यच्या तुलनेत हा झेल थोडा अवघडच होता. स्मिथ बाद झाल्यानंतर लाबुशेननं चौथ्या विकेटसाठी मॅथ्यू वेडसह १७९ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. लाबुशेननं कसोटीतील पाचवे आणि टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक झळकावले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ५ शतकांचा विक्रमही लाबुशेननं नावावर केला.  पण, टी नटराजननं वेडपाठोपाठ लाबुशेनलाही माघारी पाठवले. लाबुशेन १०८ धावांवर बाद झाला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा