मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील दोन सामन्यात युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत याला विश्वचषकाच्या दृष्टीने तयार करण्यासाठी अनुभवी महेंद्रसिंग धोनी याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे ऋषभची पहिली परीक्षा रविवारी चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने असेल. येथे तो कशी कामगिरी करतो, यावर विश्वचषकाची त्याची दावेदारी विसंबून असेल. कर्णधार विराट कोहली विश्वचषक संघाच्या सर्वच संभाव्य खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. याच कारणास्तव संघ व्यवस्थापन ऋषभची परीक्षा घेणारआहे. धोनीला विश्रांती दिल्यामुळे ऋषभला फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरावे लागेल. याशिवाय मोहम्मद शमीच्या जागी भुवनेश्वर कुमार याला संधी दिली जाईल. शमीला तिसऱ्या सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवलाय.
09:44 PM
चौथ्या सामन्यात भारतावर ऑस्ट्रेलियाची मात
09:18 PM
टर्नरने चौकारासर झळकावले पहिले अर्धशतक
08:55 PM
चहलने काढली शतकवीर हँड्सकॉम्बची विकेट
08:33 PM
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅक्सवेल आऊट
08:28 PM
पीटर हँड्सकॉम्बचे पहिले शतक
भुवनेश्वर कुमराच्या 35व्या षटकामध्ये एकेरी धाव घेतले आपले पहिले शतक साजरे केले.
08:14 PM
उस्मान ख्वाजाचे शतक हुकले
07:36 PM
पीटर हँड्सकॉम्बचे अर्धशतक
07:16 PM
उस्मान ख्वाजाचे अर्धशतक
अठराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत उस्मान ख्वाजाने आपले अर्धशतक पूर्ण केले.
06:06 PM
शॉन मार्श बाद, ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
05:51 PM
प्रथम फलंदाजी करताना भरताच्या 358 धावा
05:15 PM
प्रथम फलंदाजी करताना भरताच्या 358 धावा
05:11 PM
भोपळाही न फोडता युजवेंद्र चहल आऊट
05:09 PM
15 चेंडूंत 26 धावा करत विजय शंकर बाद
05:06 PM
भुवनेश्वर कुमार आऊट
04:47 PM
रीषभ पंत 36 धावांवर आऊट
04:38 PM
झाम्पाच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल आऊट
04:19 PM
विराट कोहली आऊट, भारताला तिसरा धक्का
04:08 PM
भारताला दुसरा धक्का, शतकवीर धवन आऊट
03:42 PM
सलामीवीर धवनचे शतक पूर्ण
03:37 PM
रोहित शर्माचे शतक पाच धावांनी हुकले
03:06 PM
रोहित शर्माचे 61 चेंडूंत अर्धशतक
01:53 PM
भारत पाच षटकांत बिनबाद 23
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संयत सुरुवात केली. त्यामुळे भारताने पहिल्या पाच षटकांमध्ये एकही बळी न गमावता 23 धावा केल्या.
01:24 PM
भुवनेश्वर आणि चहल यांचे भारतीय संघात पुनरागमन
01:22 PM
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली