India vs Australia, 3rd Test : रोहित शर्माला बाद केल्याचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आनंद क्षणात विरला; जाणून घ्या नेमकं काय झालं 

India vs Australia, 3rd Test, Day 2 : विल पुकोव्हस्की ( ६२), मार्नस लाबुशेन ( ९१) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर स्टीव्हन स्मिथनं ( १३१) शतकी खेळी केली. पण, जडेजानं ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारू दिला नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: January 8, 2021 11:48 AM2021-01-08T11:48:00+5:302021-01-08T11:48:35+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test, Day 2 : The Australians thought they had Rohit Sharma, but a review changes the decision | India vs Australia, 3rd Test : रोहित शर्माला बाद केल्याचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आनंद क्षणात विरला; जाणून घ्या नेमकं काय झालं 

India vs Australia, 3rd Test : रोहित शर्माला बाद केल्याचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आनंद क्षणात विरला; जाणून घ्या नेमकं काय झालं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 3rd Test, Day 2 : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं सॉलिड सुरुवात केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) या नव्या जोडीनं टीम इंडियाला सकारात्मक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ही जोडी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून रडीचा डावही खेळला गेला. २४व्या षटकात अम्पायरने त्यांना यश मिळवून दिलं आणि रोहित बाद झाल्याचा आनंद साजरा झाला. पण, क्षणात हे चित्र बदललं... जाणून घेऊया नेमकं काय झालं...

विल पुकोव्हस्की ( ६२), मार्नस लाबुशेन ( ९१) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर स्टीव्हन स्मिथनं ( १३१) शतकी खेळी केली. पण, जडेजानं ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारू दिला नाही. जडेजानं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि स्मिथलाही त्यानं धावबाद केलं. मयांक अग्रवालच्या जागी संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितनं युवा फलंदाज शुबमनसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 
डिसेंबर २०१०नंतर भारतीय सलामीवीरांना आशिया खंडाबाहेर प्रथमच २० हून अधिक षटकं खेळता आली. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांनी सेंच्युरियन कसोटीत २९.३ षटकं खेळली होती.  

रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचे शतक साजरा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. इयॉन मॉर्गन ( ६३), ब्रेंडन मॅक्युलम ( ६१), सचिन तेंडुलकर ( ६०), महेंद्रसिंग धोनी ( ६०) यांनाही असे करता आले नाही.  २४व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर सिली पॉईंटला रोहितचा झेल टिपला गेला अन् अम्पायरनं त्याला बाद दिले. पण, रोहितनं लगेच DRS घेतला आणि त्यात चेंडू थायपॅडला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे पंचांना निर्णय बदलावा लागला.



पण, २७व्या षटकात जोश हेझलवूडनं भारताला धक्का दिलाच. रोहित व गिलची ७० धावांची भागीदारी संपुष्टात आली. हेझलवूडनं त्याच्याच गोलंदाजीवर रोहितचा झेल घेतला. रोहित २६ धावांवर बाद झाला.
 

Web Title: India vs Australia, 3rd Test, Day 2 : The Australians thought they had Rohit Sharma, but a review changes the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.