मधली फळी आणखी चांगली खेळली असती, तर टीम इंडिया जिंकली असती; राजीव शुक्ला याचं क्रिकेट 'ज्ञान', नेटिझन्सकडून ट्रोल

India vs Australia, 3rd Test : भारतीय संघानं सिडनी कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाच्या तोंडाशी असलेला विजयाचा घास हिरावून घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 12, 2021 07:39 AM2021-01-12T07:39:30+5:302021-01-12T07:40:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test : BCCI vice-president Rajeev Shukla And Babul Supriyo Trolled After Criticizing India’s Performance In Sydney Test | मधली फळी आणखी चांगली खेळली असती, तर टीम इंडिया जिंकली असती; राजीव शुक्ला याचं क्रिकेट 'ज्ञान', नेटिझन्सकडून ट्रोल

मधली फळी आणखी चांगली खेळली असती, तर टीम इंडिया जिंकली असती; राजीव शुक्ला याचं क्रिकेट 'ज्ञान', नेटिझन्सकडून ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघानं सिडनी कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केलीऑस्ट्रेलियाच्या तोंडाशी असलेला विजयाचा घास हिरावून घेतलाआर अश्विन आणि हनुमा विहारी या जोडीनं जवळपास चार-साडेचार तास खिंड लढवली

India vs Australia, 3rd Test : भारतीय संघानं सिडनी कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाच्या तोंडाशी असलेला विजयाचा घास हिरावून घेतला. आर अश्विन ( R Ashwin) आणि हनुमा विहारी ( Hanuma Vihari) या जोडीनं खेळपट्टीवर जवळपास चार-साडेचार तास खिंड लढवली. चेतेश्वर पुजाराच्या ( Cheteshwar Pujara) विकेटनंतर टीम इंडियाचं काही खरं नाही, असच सर्वांना वाटले होते. फ्रॅक्चर अंगठा असूनही रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) पॅड व ग्लोज घालून तयारच होता. पण, अश्विन-विहारी जोडीनं त्याला त्रास होऊ दिला नाही. या दोघांनीच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा मारा झेलला आणि तो यशस्वीरित्या परतवूनही लावला. भारतानं हा सामना अनिर्णीत राखल्यानंतर BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्यासह सर्वांनीच टीम इंडियाचे कौतुक केलं. पण, BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला ( Rajiv Shukla) यांचं मत काही वेगळेच आहे आणि त्यांच्या क्रिकेट 'ज्ञानाचा' नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला.

पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात अजिंक्य ( ४) माघारी परतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का होता. पण, संघ व्यवस्थापनानं नॅथन लियॉनचा सामना करण्यासाठी लेफ्ट हँडर रिषभ पंतला ( Rishabh Pant) बढती देण्याचा डाव खेळला. पहिले ३०-३५ चेंडूंवर संयमी खेळ करून सेट झालेल्या रिषभनं नंतर तुफान फटकेबाजी केली. तो क्रिजवर असेपर्यंत टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, असेच वाटत होते. पण, लियॉननेच त्याला ९७ धावांवर माघारी पाठवले. चेतेश्वर पुजाराही ( Cheteshwar Pujara) ७७ धावांवर माघारी परतल्यानं आता सामना वाचवण्याचे आव्हान टीम इंडियावर आले. विजय मिळवणे अवघड आता अनिर्णीत राखण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून अश्विन-विहारी खेळपट्टीवर नांगर रोवून उभे राहिले. 

विहारी पायाचं दुखणं घेऊन मैदानावर दृढ निश्चयानं खेळत राहिला. ऑसी गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूनं अश्विनच्या शरीरावर मारा करून त्याला जखमी करण्याचाही प्रयत्न केला. पण, सर्व व्यर्थ ठरले. विहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला. त्यांच्या या चिवट खेळीचे सर्वांनी कौतुक केलं. पण, राजीव शुक्ला म्हणाले, ''खरं पाहिलं तर मधल्या फळीला आणखी चांगली कामगिरी करता आली असती आणि आपण हा सामना जिंकला असता.''


तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबुल सुप्रियो Babul Supriyos यांनी हनुमा विहारीच्या खेळीबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं. “फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडूंचा सामना केला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारलं नाही तर त्यानं क्रिकेटची हत्याही केली. मला क्रिकेटमधलं अधिक कळत नाही हे माहित आहे," असं बाबुल सुप्रियो यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

नेटिझन्सनी या दोघांनाही चांगलेच सुनावले




 

Web Title: India vs Australia, 3rd Test : BCCI vice-president Rajeev Shukla And Babul Supriyo Trolled After Criticizing India’s Performance In Sydney Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.