मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न वन डे सामन्याचा दिवस गाजवला तो भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलने . त्याने 42 धावा देत ऑसींच्या सहा फलंदाजांना बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 230 धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियात सहा विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय फिरकीपटू आहे. त्याचबरोबर त्याने 15 वर्षांपूर्वी अजित आगरकरने नोंदवलेल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चहलच्या या कामगिरीवर क्रिकेट वर्तुळात कौतुक होत आहे, परंतु यात माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं केलेलं ट्विट विशेष गाजत आहे.
पाहा व्हिडीओ...