मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात द्विदेशीय वन डे मालिका जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतीय संघाने सिडनीत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून ऐतिहासिक मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे. या सामन्यात भारतीय संघात नवा भिडू पदार्पण करणार आहे. तामिळनाडूच्या विजय शंकरला तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात वन डे पदार्पण करणारा तो 226 वा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू विजयचा प्रवास जाणून घेवूया...
- विजय शंकरचा जन्म 26 जानेवारी 1991 चा. - विजय उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. - कारकिर्दीच्या सुरुवातीला विजय ऑफ स्पिनर होता, परंतु त्याने मध्यमगती गोलंदाज होण्याचे ठरवले आणि त्याला तामिळनाडू संघात स्थान पटकावले. - प्रवासामुळे येणारा आळसपणा टाळण्यासाठी विजय घरच्या टेरेसवर क्रिकेटचा सराव करायचा. त्याने गच्चीचे नेट्समध्ये रुपांतर केले होते.