India vs Australia 3rd odi: पाहा धोनीचा असाही चमत्कार, मॅक्सवेल झाला पसार

धोनीने असे नेमके काय केले, ते या व्हिडीओमध्ये पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 18:11 IST2019-03-08T18:09:46+5:302019-03-08T18:11:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs Australia 3rd ODI: ms Dhoni's dismiss Glenn Maxwell in new fashion | India vs Australia 3rd odi: पाहा धोनीचा असाही चमत्कार, मॅक्सवेल झाला पसार

India vs Australia 3rd odi: पाहा धोनीचा असाही चमत्कार, मॅक्सवेल झाला पसार

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा एक चाणाक्ष यष्टीरक्षक आहे. फलंदाज नेमका आता कोणता फटका मारणार, हेदेखील धोनीला माहिती असतं. धोनीने आजच्या तिसऱ्या सामन्यात ज्याप्रकारे ग्लेन मॅक्सवेलला रन आऊट केले, ते पाहाल तुम्हाला सुखद धक्काच बसेल. कारण असे रन आऊट फक्त धोनीच करू शकतो, असंही तुम्ही म्हणाल...

ही गोष्ट घडली ती 42व्या षटकात. कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. त्याचा सामना करत होता शॉन मार्श. मार्शने हा चेंडू कव्हर्सच्या दिशेने टोलवला. मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल धाव घेण्यासाठी निघाले. त्यावेळी कव्हर्समध्ये असलेल्या रवींद्र जडेजाने चेंडू पकडला आणि तो धोनीच्या दिशेने भिरकावला. जडेजाचा थ्रो हा थेट यष्ट्यांवर जाणार नव्हता. चेंडू बराच लांब होता. पण धोनीने एक आयडिया केली आणि मॅक्सवेलला रन आऊट होऊन माघारी परतावे लागले. धोनीने असे नेमके काय केले, ते या व्हिडीओमध्ये पाहा...



दमदार सलामीनंतरही ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 313 धावा करता आल्या. या 313 धावा नेमक्या कोणत्या संघाचे तीन तेरा वाजवणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा चांगलाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी उचलला. आरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी 193 धावांची सलामी दिली. पण कुलदीप यादवने फिंचला बाद करत ही जोडी फोडली. फिंचने 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 93 धावा केल्या. फिंचचे शतक हुकले असले तरी ख्वाजाने मात्र शतक पूर्ण केले. फिंचने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 104 धावा केल्या. शतक झळकावल्यावर ख्वाजाला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. ख्वाजानंतर ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे जवळपास दोनशे धावांची भागीदारी 32 षटकांमध्ये होऊनही ऑस्ट्रेलियाला 313 धावांपर्यंतच मजल मारता आली.

Web Title: India vs Australia 3rd ODI: ms Dhoni's dismiss Glenn Maxwell in new fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.