Join us  

India vs Australia, 3rd ODI: विराट कोहलीचा स्टनिंग कॅच, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का Video

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या सलामीवीरांना अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 4:05 PM

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या सलामीवीरांना अपयश आले. पण, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. स्मिथ व लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी केली, परंतु टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं स्टनिंग कॅच घेत ही भागीदारी संपुष्टात आणली. 

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संयमी सुरुवात केली. पण, मोहम्मद शमीनं चतुराईनं वॉर्नरचा अडथळा दूर केला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर ( 3) यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला 19 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर फिंच आणि स्टीव्ह स्मिथ डाव सावरतील असे वाटले होते, पण या जोडीला समन्वय राखता आला नाही. मोहम्मद शमीनं भारताला दुसरे यश मिळवून दिले.

पाहा व्हिडीओ...नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्मिथनं फटका मारल्यानंतर धाव घेण्यासाठी आवाज दिला. फिंचनं तोपर्यंत क्रीज सोडली होती आणि चेंडू भारतीय फलंदाजाच्या हातात असल्याचे दिसताच स्मिथ पुन्ही क्रीजवर परतला. फिंच तोपर्यंत खूप पुढे आला होता आणि त्ला धावबाद व्हावे लागले. त्यानंतर फिंच स्मिथच्या दिशेनं आरडाओरड करताना तंबूत गेला. ऑस्ट्रेलियानं 10 षटकांत 2 बाद 56 धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ..स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. स्मिथनं 63 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या जोडीनं अर्धशतकी भागीदारीचे शतकात रुपांतर करताना ऑसींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर विराट कोहलीनं स्टनिंग कॅच घेताना लाबुशेनला बाद केले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर लाबुशेन 54 धावांवर माघारी परतला. कोहलीच्या कॅचनं सोशल मीडियावर धुरळा उडवला...

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीडेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंचरवींद्र जडेजास्टीव्हन स्मिथ