India vs Australia 3rd odi : 313 की तीन तेरा... भारताचे की ऑस्ट्रेलियाचे वाजणार

आरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी 193 धावांची सलामी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 17:28 IST2019-03-08T17:26:37+5:302019-03-08T17:28:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs Australia 3rd odi: 313 runs scored by Australia in 1st innings | India vs Australia 3rd odi : 313 की तीन तेरा... भारताचे की ऑस्ट्रेलियाचे वाजणार

India vs Australia 3rd odi : 313 की तीन तेरा... भारताचे की ऑस्ट्रेलियाचे वाजणार

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दमदार सलामीनंतरही ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 313 धावा करता आल्या. या 313 धावा नेमक्या कोणत्या संघाचे तीन तेरा वाजवणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा चांगलाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी उचलला. आरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी 193 धावांची सलामी दिली. पण कुलदीप यादवने फिंचला बाद करत ही जोडी फोडली. फिंचने 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 93 धावा केल्या. फिंचचे शतक हुकले असले तरी ख्वाजाने मात्र शतक पूर्ण केले. फिंचने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 104 धावा केल्या. शतक झळकावल्यावर ख्वाजाला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. ख्वाजानंतर ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे जवळपास दोनशे धावांची भागीदारी 32 षटकांमध्ये होऊनही ऑस्ट्रेलियाला 313 धावांपर्यंतच मजल मारता आली.



 

Web Title: India vs Australia 3rd odi: 313 runs scored by Australia in 1st innings