Join us

India vs Australia, 2nd Test : What a Catch!; टीम पेनची यष्टींमागे चपळाई पाहून चेतेश्वर पुजाराही अवाक्, Video

India vs Australia, 2nd Test : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 27, 2020 06:44 IST

Open in App

India vs Australia, 2nd Test : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची. पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल भोपळा न फोडता माघारी परतला, परंतु पदार्पणवीर शुबमन गिल ( Shubhaman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाला सावरले. गिलनं काही सुरेख फटके मारून त्याची निवड सार्थ असल्याचे सिद्ध केले. त्यानं आक्रमक खेळावर अधिक भर दिला आणि त्यामुळे टीम इंडियाची धावांचा वेगही चांगला राहिला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑसी गोलंदाजांनी वेगवान मारा करताना गिल व पुजाराला चाचपडवले. दोघांना जीवदानही मिळाले. पण, अखेरीस पॅट कमिन्सनं त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी ऑसींनी DRS घेतला, परंतु तो अपयशी ठरला. २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑसींना दिवसाचे पहिले यश मिळाले. ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावा करणारा गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्याच पेननं पुजाराचे काही सोपे झेल सोडले. पण, त्याची भरपाई त्यानं अफलातून कॅच घेऊन केली. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूनं पुजाराच्या बॅटचे चुंबन घेतले आणि तो पहिल्या स्लीपच्या दिशेनं फिरला. पेननं चपळाईनं त्या दिशेनं झेप घेत भारताला धक्का दिला. पुजारा ७० चेंडूंत १७ धावा करून बाद झाला.

पाहा अफलातून कॅच

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचेतेश्वर पुजाराशुभमन गिलमयांक अग्रवाल