Join us

India vs Australia 2nd T20 : मॅक्सवेलचा एअर स्ट्राइक; झंझावाती शतकासह ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

या विजयासह ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-20 मालिका 2-0 अशा फरकाने खिशात टाकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 22:36 IST

Open in App

बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियापुढे 191 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठालाग करताना मॅक्सवेलने 55 चेंडूंत सात चौकार आणि नऊ षटाकारांच्या जोरावर नाबाद 113 धावांची स्फोटक खेळी साकारली. मॅक्सवेलच्या या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकामध्ये विजयाला गवसणी घातली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-20 मालिका 2-0 अशा फरकाने खिशात टाकली आहे.

 

 

 

स्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आपले अर्धशतक 28 चेंडूंमध्ये पूर्ण केले होते. मॅक्सवेलने आपल्या अर्धशतकी खेळीत चार चौकार आणि तीन षटकार लगावले.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेल