बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विशाखापट्टणम येथे फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. भारताच्या 126 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियालाही घाम गाळावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्याची रंजकता कायम होती आणि त्यात ऑस्ट्रेलियाने तीन विकेट राखून बाजी मारली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या या दौऱ्यात चांगली कामगिरी करून मनोबल उंचावण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून इतिहास घडवण्याची संधीही त्यांना आहे. अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघाला 11 वर्षांत प्रथमच भारताविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia 2nd T20 : 11 वर्षांत जे जमलं नाही ते ऑस्ट्रेलिया आज करून दाखवणार?
India vs Australia 2nd T20 : 11 वर्षांत जे जमलं नाही ते ऑस्ट्रेलिया आज करून दाखवणार?
India vs Australia 2nd T20 : विशाखापट्टणम येथे फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पराभव पत्करावा लागला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 11:44 IST