Join us

India vs Australia, 2nd ODI: कोहलीने असे केले शतकाचे सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

कोहली सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:48 IST

Open in App

नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आपले शतक साजरे केले. विराटचे हे एकदिवसीय क्रिकेटमधले 40वे शतक ठरले. तो सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 49 शतके आहेत.

पाहा हा व्हिडीओ

विराट कोहली ठरला जगातील सर्वोत्तम फलंदाजनागपूर येथे सुरु असलेल्या जामठाच्या खेळपट्टीवर भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरस्थावर होता आले नाही. पण कोहलीने मात्र दमदार खेळी साकारत सर्वोत्तम फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

जामठ्याच्या मैदानात यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. पण या सामन्यात धोनी शून्यावर आऊट झाला. दुसरीकडे कोहलीने अर्धशतकाची वेस ओलांडली आणि त्यानंतर काही वेळात त्याने सर्वोत्तम फलंदाज होण्याचा जमान पटकावला. 

या मैदानात धोनीच्या सर्वाधिक धावा होत्या. धोनीने चार डावांमध्ये दोन अर्धशतकांसह 268 धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनीला एकही धाव करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने त्याला पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. या सामन्यापूर्वी कोहलीच्या या मैदानात 209 धावा होत्या. त्यामुळे सामना होण्यापूर्वी कोहली धोनीपेक्षा 59 धावांनी पिछाडीवर होता. कोहलीने या सामन्यात नेत्रदीपक फलंदाजी करत धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे आता जामठ्याच्या मैदानात सर्वाधिक धावा करणारा कोहली हा अव्वल फलंदाज ठरला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया