Join us

India vs Australia 2nd ODI : मोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणात 'नकोसा' विक्रम

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाने  अ‍ॅडलेड वन डे सामन्यात भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 12:58 IST

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले आहेशॉन मार्शच्या 131, तर ग्लेन मॅक्सवेलच्या 48 धावाभुवनेश्वर कुमारच्या नावावर चार, तर मोहम्मद शमीच्या नावावर 3 विकेट

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : शॉन मार्शची शतकी खेळी आणि अन्य सहकाऱ्यांच्या छोटेखानी भागीदारींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने  अ‍ॅडलेड वन डे सामन्यात भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले आहे. अ‍ॅरोन फिंच व अ‍ॅलेक्स करी हे दोन्ही सलामीवर झटपट बाद झाल्यानंतर मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्याने उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोयनिस यांच्यासह प्रत्येकी अर्धशतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ग्लेन मॅक्सवेलने अखेरच्या दहा षटकांत जोरदार फटकेबाजी करताना 48 धावा चोपल्या. त्यामुळे एकवेळ 250 पर्यंतच मजल मारू शकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 9 बाद 298 धावा केल्या. पण, या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला.तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे आणि त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक झाले आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना 26 धावांवर माघारी पाठवून चांगली सुरुवात करून दिली.  मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी ऑस्ट्रेलियाला 26 धावांवर दोन धक्के दिले. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजाने अफलातून फिल्डींग करताना ही सेट जोडी तोडली.  गोलंदाजीतही जडेजाने आपली चुणूक दाखवताना पीटर हँड्सकोम्बला बाद केले. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अगदी चतुराईने हँड्सकोम्बला यष्टिचीत केले. त्यानंतर मार्श व मॅक्सवेल यांनी ऑस्ट्रेलियाला मोठा पल्ला गाठून दिला. भुवनेश्वर कुमारने एकाच षटकात दोघांना माघारी पाठवल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणखी मोठी धावसंख्या करू शकला नाही. पदापर्पणाचा सामना खेळणाऱ्या सिराजने 10 षटकांत 76 धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलला पंचांनी पायचीत बाद दिले होते, परंतु DRS घेतल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. त्याशिवाय त्याच्याच गोलंदाजीवर मॅक्सवेलचेच दोन झेल सुटले. त्यामुळे त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये सिराजने दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने अमित भंडारीने 2000 मध्ये नोंदवलेला विक्रम मोडला. भंडारीने पाकिस्तानविरुद्ध ढाका येथे 10 षटकांत 2 बाद 75 धावा दिल्या होत्या. या विक्रमात कर्सन घावरी ( 11 षटकांत 0/83 धावा) आघाडीवर आहेत. 1975 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स सामन्यात त्यांनी वन डे पदार्पण केले होते.   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामीभुवनेश्वर कुमारबीसीसीआय