बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विशाखापट्टणम येथे फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. भारताच्या 126 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियालाही घाम गाळावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्याची रंजकता कायम होती आणि त्यात ऑस्ट्रेलियाने तीन विकेट राखून बाजी मारली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकल्यावर भारताला ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवता येईल. पण भारताने सामना गमावला तर त्यांच्या हातून मालिका निसटणार आहे.
10:29 PM
दुसऱ्या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली, मॅक्सवेलचे झंझावाती शतक
ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियापुढे 191 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठालाग करताना मॅक्सवेलने 55 चेंडूंत सात चौकार आणि नऊ षटाकारांच्या जोरावर नाबाद 113 धावांची स्फोटक खेळी सााकारली. मॅक्सवेलच्या या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकामध्ये विजयाला गवसणी घातली.
10:19 PM
ग्लेन मॅक्सवेलचे धडाकेबाज शतक
ग्लेन मॅक्सवेलने 50 चेंडूंत सहा चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 100 धावा पूर्ण केल्या.
09:57 PM
ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक पूर्ण
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आपले अर्धशतक 28 चेंडूंमध्ये पूर्ण केले आहे. मॅक्सवेलने आपल्या अर्धशतकी खेळीत चार चौकार आणि तीन षटकार लगावले.
09:56 PM
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, डी' आर्सी शॉर्ट आऊट
09:24 PM
ऑस्ट्रेलिया 6 षटकांनंतर 2 बाद 42
पहिल्या पॉवर-प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाला दोन फलंदाज गमावत 42 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का मार्कस स्टॉइनिसच्या रुपात बसला. त्यानंतर कर्णधार आरोन फिंच हा आठ धावांवर बाद झाला. भारताकडून विजय शंकर आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
09:14 PM
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, आरोन फिंच आऊट
ऑस्ट्रेलियाला कर्णधार आरोन फिंचच्या रुपात दुसरा धक्का बसला आहे. विजय शंकरने शिखर धवनकरवी फिंचला बाद केले. फिंचला यावेळी फक्त आठ धावा करता आल्या.
09:03 PM
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मार्कस स्टॉइनिस आऊट
08:52 PM
ऑस्ट्रेलियाची झोकात सुरुवात, पहिल्याच चेंडूवर चौकार
विजय शंकरच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ़़डी' आर्सी शॉर्टने चौकार लगावला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 191 धावांची गरज आहे.
08:41 PM
प्रथम फलंदाजी करताना भारताच्या 190 धावा
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 72 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात 190 धावांपर्यंत मजल मारली. कोहलीने यावेळी 38 चेंडूंत 2 चौकार आणि सहा षटाकारांच्या जोरावर नाबाग 72 धावा फटकावल्या. कोहलीला यावेळी धोनीने चांगली साथ दिली. धोनीने 23 चेंडूंत ्तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 40 धावा केल्या. सलामीवीर लोकेश राहुलने यावेळी 47 धावांची खेळी साकारली. त्याचे अर्धशतक 3 धावांनी हुकले.
08:35 PM
महेंद्रसिंग धोनीची झंझावाती खेळी संपुष्टात
धोनीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. धोनीने यावेळी 23 चेंडूंत 40 धावांची स्फोटकी खेळी साकारली. धोनीने या खेळीत प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावले.
08:23 PM
विराट कोहलीचे 29 चेंडूंत अर्धशतक
08:21 PM
विराट कोहली तळपला, केली षटकारांची हॅट्ट्रिक
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कल्टर निलच्या सोळाव्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर कोहलीने षटकार लगावले.
08:16 PM
पंधराव्या षटकात भारताचे शतक पूर्ण
07:58 PM
रिषभ पंत एक धाव काढून तंबूत परतला
07:50 PM
सलामीवीर शिखर धवन आऊट, भारत 2 बाद 70
07:38 PM
भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल 47 धावांवर बाद
07:36 PM
सात षटकांमध्ये भारत बिनबाद 61
पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावलेल्या लोकेश राहुलने दुसऱ्या सामन्यातही दमदार फलंदाजी केली आहे. राहुलच्या 25 चेंडूंतील 47 धावांच्या मदतीने भारताने सात षटकांमध्ये बिनबाद 61 अशी मजल मारली आहे. शिखर धवन यावेळी 11 धावांवर नाबाद खेळत आहे.
07:31 PM
लोकेश राहुलच्या तिसऱ्या षटकारासह भारताचे अर्धशतक
07:27 PM
लोकेश राहुल पुन्हा तळपला, पाचव्या षटकात लगावले दोन षटकार
07:21 PM
लोकेश राहुलच्या चौकाराने भारताची 'विशी' पार, भारत 4 षटकांत बिनबाद 24
07:14 PM
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
07:00 PM
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
07:00 PM
शिखर धवनची धमाकेदार सुरुवात, एकाच षटकात भारताचे दोन चौकार
06:54 PM
रोहित शर्माला वगळले, दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची झाली घोषणा
दोन्ही संघ
Web Title: India vs Australia 2nd T20 : ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलिया विजयी
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.