ठळक मुद्देतीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत 0-1 पिछाडीवरऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना मंगळवारी अॅडलेडवरभुवनेश्वर कुमार अॅडलेड सामन्यासाठी करतोय विशेष तयारी
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला वन डे मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी अॅडलेड येथे होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात 34 धावांनी विजय नोंदवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सिडनीतील सामन्यात गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत दिलेल्या 50 धावा भारताला महागात पडल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 5 बाद 288 धावांचे आव्हान उभं करता आलं. प्रत्युत्तरात भारताला 9 बाद 254 धावाच करता आल्या. या सामन्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराला परत बोलावण्याची मागणी जोर धरू लागली आणि भुवनेश्वर कुमारवर टीकाही झाली.
स्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 289 धावांचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज 4 धावांवर माघारी परतले होते. रोहित शर्मा ( 133) आणि महेंद्रसिंग धोनी ( 51) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीयांना विजयाच्या आशा होत्या. 46व्या षटकांत तो माघारी परतला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. तत्पूर्वी, उस्मान ख्वाजा (59), शॉन मार्श (54) आणि पीटर हँड्सकोम्ब (73) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले आहे. मार्कस स्टोइनिसने ( नाबाद 47) अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
पहिल्या सामन्यातील चुकांतून धडा घेत भुवनेश्वर कुमार ऑसी फलंदाजांना रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. सिडनीवरील सामन्यात भुवनेश्वरने 10 षटकांत 66 धावा दिल्या होत्या आणि त्यामुळे पराभवानंतर त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल. त्या सामन्यातील चुका सुधारण्यासाठी भुवनेश्वर कसून सराव करत आहे. तो यॉर्करचा मारा करण्यासाठी खास टेक्निकचा वापर करत आहे. त्याची ही टेक्निक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु भुवनेश्वरने त्यामागचं कारणही सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ...