Join us

मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल यांची पहिल्या वन डेतून माघार; जाणून घ्या IND vs AUSच्या पूर्ण डिटेल्स

IND vs AUS ODI Series - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वन डे सामन्यांची मालिका होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 14:57 IST

Open in App

IND vs AUS ODI Series - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. २२ सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून India vs Australia मालिका सुरू होतेय आणि त्याआधीच ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोन खेळाडू पहिल्या वन डे सामन्यात खेळणार नाहीत. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाने तगडा संघ मैदानावर उतरवला आहे, परंतु पहिल्या सामन्यापूर्वी त्यांना धक्का बसला. 

स्टार्क जुलै २०२३ पासून स्टार्क ऑस्ट्रेलिया संघाबाहेर आहे. अॅशेस मालिकेच्या अखेरच्या कसोटीत त्याच्या खांदेदुखीनं डोकं वर काढलं होतं, त्या मालिकेत त्याने सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या होत्या आणि प्लेअर ऑफ दी सीरिजचा पुरस्कार पटकावला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेतूनही त्याने माघार घेतली. पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ हे दुखापतीतून सावरताना पुनरागमन करणार आहेत. मॅक्सवेलच्या पायाला मागच्यावर्षी गंभीर दुखापत झाली होती आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सराव करताना त्याचा पाय मुरगळला होता.    

ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स ( कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स केरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रून, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा

 भारताचा संघ ( पहिल्या दोन वन डे साठी) - लोकेश राहुल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर  

भारताचा संघ ( तिसऱ्या वन डे साठी) - रोहित शर्मा, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल ( फिटनेसवर), आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर

वेळापत्रक२२ सप्टेंबर - पहिली वन डे , मोहाली२४ सप्टेंबर - दुसरी वन डे, इंदूर२७ सप्टेंबर - तिसरी वन डे, राजकोट

सामना कुठे पाहता येईल - Jio Cinema आणि स्पोर्ट्स १८ वर थेट प्रक्षेपण

किती वाजता - दुपारी १.३० वाजल्यापासून मॅच सुरू होईल 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेल