IND vs AUS 1st Test : अश्विनचा 'हा' चेंडू कुठे गेला कुणालाच कळलं नाही, पाहा हा व्हिडीओ

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक असा चेंडू त्याने टाकला की, तो कुठून कुठे गेला हे कुणालाही समजलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 13:45 IST2018-12-07T13:45:28+5:302018-12-07T13:45:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
INDIA vs AUSTRALIA 1st Test: R Ashwin's Amazing Balling See This Video | IND vs AUS 1st Test : अश्विनचा 'हा' चेंडू कुठे गेला कुणालाच कळलं नाही, पाहा हा व्हिडीओ

IND vs AUS 1st Test : अश्विनचा 'हा' चेंडू कुठे गेला कुणालाच कळलं नाही, पाहा हा व्हिडीओ

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा फिरकीपटू आर. अश्विन हा सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने तीन बळी घेतले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक असा चेंडू त्याने टाकला की, तो कुठून कुठे गेला हे कुणालाही समजलं नाही.

पाहा हा व्हिडीओ


इशांत शर्माने आरोन फिंचला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यावेळी पीटर हँड्सकॉम्ब संघासाठी धावून आला, त्याने पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे सावरलेला नव्हता. त्यावेळी हेडने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हेडने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावांची खेळी साकारली. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद 191अशी मजल मारली आहे.


Web Title: INDIA vs AUSTRALIA 1st Test: R Ashwin's Amazing Balling See This Video