Join us

India vs Australia 1st T20 : भारतीय संघ हरला, पण बुमराने विक्रम नोंदवला; केली अश्विनशी बरोबरी 

India vs Australia 1st T20: जस्प्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिध्द केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 12:11 IST

Open in App

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जस्प्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिध्द केले. पण, त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही भारताला विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियाने हातातोंडाशी आलेला घास भारताकडून हिसकावून घेतला. बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी बुमराने तीन विकेट घेत एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर अश्विन याच्यानंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण, अखेरच्या षटकार उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. पण, या सामन्यात तीन विकेट्स घेत बुमराहने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये  एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्मा ( 5) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघात झोकात पुनरागमन केले. कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. राहुलने 36 चेंडूंत 50 धावा केल्या. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या काही चमक न दाखवता माघारी परतले. धोनी एका बाजूने टिकून खेळत होता, परंतु त्यालाही मोठे फटके मारता येत नव्हते. भारताला 20 षटकांत 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. बुमरहने या सामन्यात तीन विकेट घेत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण केले. अश्विननंतर ट्वेंटी-20 त पन्नास विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. अश्विनच्या नावावर 46 सामन्यांत 52, तर बुमराहच्या नावावर 41 सामन्यांत 51 विकेट्स आहेत.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया