Join us  

India vs Australia: पहिल्या सामन्यातील 'त्या' निर्णयाचा विराट कोहली पुनर्विचार करणार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः यजमान भारताला पहिल्या वन डे सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 9:47 AM

Open in App
ठळक मुद्दे2020मधील पहिल्याच वन डे सामन्यात टीम इंडियाची हार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः यजमान भारताला पहिल्या वन डे सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांचा अपयशाचा पाढा गोलंदाजांनीही गिरवला. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेले 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यात घेतलेल्या एका निर्णयाचा पुनर्विचार करणार असल्याचे संकेत दिले. 

India vs Australia : दहा विकेट्सने लाजीरवाणा पराभव पत्करण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही, तर...

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास; देशासाठी केला मोठा पराक्रम

India vs Australia : वॉर्नर आणि फिंच यांनी विश्वविक्रमासह भारताला दिला पराभवाचा धक्का

नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटलाही प्रथम गोलंदाजीच हवी होती, परंतु नाणेफेक फिंचनं जिंकली. या सामन्यात टीम इंडिया तीन सलामीवीरांसह मैदानावर उतरली. पण, त्यापैकी रोहित शर्माने निराश केले. तो अवघ्या 10 धावांवर माघारी परतला, परंतु लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. राहुल ( 47) माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. धवन ( 74), विराट ( 16) आणि श्रेयस अय्यर ( 4) हे झटपट माघारी परतले. रिषभ पंत ( 28) आणि रवींद्र जडेजा ( 25) यांनी सावध खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी चतुराईनं भारताच्या धावांवर लगाम लावला. मिचेल स्टार्कनं तीन, तर पॅट कमिन्स व केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

255 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचीही तशीच अवस्था होईल, असं अनेकांना वाटत होते. पण, वॉर्नर आणि फिंच या जोडीनं खेळपट्टीवर तंबू रोवला आणि यजमानांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या जोडीनं नाबाद 258 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. वॉर्नरने 112 चेंडूंत 17 चौकार व 3 षटकारांसह 128, तर फिंचने 114 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 110 धावा केल्या.

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत कोहली म्हणाला,''एका फॉरमॅटमधील अनुभव तुम्हाला दुसऱ्या फॉरमॅटमध्ये वापरता यायला हवा. तुम्ही सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत असाल, तर तुमचा आणि इतरांचाही आत्मविश्वास  वाढतो. लोकेश राहुलसाठी मी चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला. यावर अनेकदा आम्ही चर्चा केली होती. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फिट करण्याचा आम्ही प्रयत्न केला. हो पण, तो यशस्वी झाला नाही.''

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीडेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंच