Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs Australia 1st odi : पहिल्या सामन्यात भारताचा दमदार विजय

हैदराबाद,  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  : केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी अभेद्य यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारचाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 21:38 IST

Open in App

02 Mar, 19 09:23 PM

भारताने पहिली वनडे जिंकली

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून मात केली.



 

02 Mar, 19 09:16 PM

महेंद्रसिंग धोनीचे दमदार अर्धशतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोनीने अर्धशतक पूर्ण केले. धोनीीचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील ७१वे अर्धशतक ठरले.

02 Mar, 19 09:06 PM

धोनी आणि केदारच्या शतकी भागीदारीनंतर संघाचे सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ



 

02 Mar, 19 09:00 PM

केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी यांची शतकी भागीदारी

केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी पाचव्या विकेटसाठी  १२२ चेंडूंत १०० धावांची भागीदारी रचली. केदारने चौकार लगावत ही शतकी भागीदारी पूर्ण केली. भारताचा चौथा फलंदाज ९९ धावा असताना बाद झाला होता. 

02 Mar, 19 08:53 PM

केदार जाधवचे अर्धशतक


02 Mar, 19 08:40 PM

भारताला विजयासाठी १० षटकांमध्ये ६१ धावांची गरज

महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी संयतपणे फलंदाजी करत भारताच्या विजयाचे दार ठोठावले. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ४० षटकांमध्ये ४ बाद १७६ अशी मजल मारली होती. त्यावेळी भारताला विजयासाठी १० षटकांमध्ये ६१ धावांची गरज होती.

02 Mar, 19 07:57 PM

भारत ३० षटकांत ४ बाद १२५

महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी संयत फलंदाजी करत भारताच्या संघाला स्थिरस्थावर केले. भारताचे चार फलंदाज बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ आक्रमक झाला होता. त्यांना बॅकफूटवर ढकलण्याचे काम धोनी आणि केदार यानी केले. त्यामुळे ३० षटकांत भारताची १ बाद १२५ अशी स्थिती होती.

02 Mar, 19 07:24 PM

भारताला ९९ धावांवर चौथा धक्का, रायुडू तंबूत परतला



 

02 Mar, 19 07:17 PM

भारताला तिसरा धक्का, रोहित शर्मा बाद



 

02 Mar, 19 06:57 PM

झाम्पाचा भारताला मोठा धक्का, विराट कोहली आऊट



 

02 Mar, 19 06:24 PM

भारत १० षटकांत १ बाद ४२

ऑस्ट्रेलियाच्या २३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची १० षटकांमध्ये १ बाद ४२ अशी स्थिती होती. भारताने सलामीवीर शिखर धवनला शून्यावर गमावले. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघाचा धावफलक धावता ठेवला.

02 Mar, 19 05:47 PM

भोपळाही न फोडता शिखर धवन आऊट



 

02 Mar, 19 05:43 PM

रोहित शर्माने चौकाराने केला भारताच्या डावाचा श्रीगणेश



 

02 Mar, 19 04:58 PM

ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे २३७ धावांचे आव्हान



 

02 Mar, 19 04:54 PM

मोहम्मद शमीचा भेदक मारा, १० षटकांत ४४ धावांत २ बळी



 

02 Mar, 19 04:15 PM

मोठा धक्का... ग्लेन मॅक्सवेलला शमीने केले क्लीन बोल्ड


02 Mar, 19 04:04 PM

टर्नर क्लीन बोल्ड, मोहम्मद शमीचा अचूक मारा



 

02 Mar, 19 03:50 PM

ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण



 

02 Mar, 19 03:34 PM

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, पीटर हँडकॉम्ब आऊट



 

02 Mar, 19 03:10 PM

ऑस्ट्रलियाला तिसरा धक्का, अर्धशतकवीर उस्मान ख्वाजा बाद



 

02 Mar, 19 02:58 PM

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, स्टॉइनिस बाद

केदार जाधवने पुन्हा एकदा स्थिरस्थावर झालेली जोडी फोडून भारताला यश मिळवून दिले.



 

02 Mar, 19 02:22 PM

ऑस्ट्रेलिया १० षटकांत १ बाद ३८

कर्णधार आरोन फिंचा झटपट गमावल्यावर ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या १० षटकांमध्ये त्यांनी १ बाद ३८ अशी स्थिती होती.

02 Mar, 19 01:39 PM

ऑस्ट्रेलियाला शून्यावर पहिला धक्का, आरोन फिंच आऊट

जसप्रीत बुमराने दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शून्यावर बाद केले. त्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्या षटकात भेदक मारा केला. शमीच्या पहिल्या षटकात ऑस्ट्रेलियाला एकही धाव काढता आली नाही.

02 Mar, 19 01:09 PM

दुखापत बाजूला सारून धोनी भारतीय संघात


02 Mar, 19 01:08 PM

नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करणार



 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया