India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटीत धावांचा रतीब रचला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा उभा केल्यानंतर भारताकडूनही चांगले उत्तर मिळतेय. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी आतापर्यंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर एक धर्म आहे. पण, काही फॅन्स जाणीवपूर्वण येथील वातावरण गढूळ करण्याचे काम करताना दिसत आहेत. चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस संपल्यानंतर भारतीय खेळाडू डग आऊटच्या दिशेने जात असताना काही फॅन्स मोहम्मद शमीला पाहून मुद्दाम 'जय श्री राम' चे नारे देताना दिसले. यावेळी सूर्यकुमार यादवने मात्र हात जोडून हवेत उंचावले अन् फॅन्सना उत्तर दिले. याहीपूर्वी शमी, मोहम्मद सिराज यांनी टीळा न लावल्यावरून ट्रोल केले होते, पण त्या व्हिडीओत या दोघांसह भारताच्या अन्य सदस्यांनीही टीळा लावला नव्हता आणि जाणीवपूर्वक त्यांना वगळले गेले होते.
कॅमेरून ग्रीनने मारले दमदार फटके; उस्मान ख्वाजासह मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् बरेच पराक्रम
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला. उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) ने १० तासांहून अधिक काळ भारतीय गोलंदाजांना दमवले.. विक्रमी ४२२ चेंडूंचा सामना करताना त्याने १८० धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याने स्टीव्ह स्मिथसह आधी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर कॅमेरून ग्रीनसह ( ११४) पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. टॉड मर्फी व नॅथन लाएन या जोडीने ९व्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. अशा खेळपट्टीवर आर अश्विनने ६ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर गुंडाळला गेला.
ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३), स्टीव्ह स्मथि ( ३८), पीटर हँड्सकोम्ब ( १७) हे मोठी खेळी करू शकले नाही. दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन ( ११४) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ग्रीन व ख्वाजा यांची २०८ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. भारतातील ऑस्ट्रेलियाची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अश्विनने त्याच षटकात अॅलेक्स केरीला ( ०) माघारी पाठवले आणि मिचेल स्टार्कला ( ६) बाद केले. अक्षर पटेलने भारताला ख्वाजाची विकेट मिळवून दिली. ख्वाजा ४२२ चेंडूंत २१ चौकारांच्या मदतीने १८० धावा करून माघारी परतला. नॅथन लाएन व टॉड मर्फी ( ४१) या जोडीने ११७ चेंडूंत ७० धावा जोडल्या. अश्विनने शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांत गुंडाळला. अश्विनने ९१ धावांत ६ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"