Join us

Ind vs Aus 3rd test live : रवींद्र जडेजाने विकेट मिळवली, परंतु चुकीने एक विकेट गमावलीही; रवी शास्त्री, सुनील गावस्कर संतापले 

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत भारताला जबरदस्त प्रत्युत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 13:30 IST

Open in App

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत भारताला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. DRS न घेण्याचा चुका त्यांच्याकडून झाल्या, परंतु वेळीच स्मिथने योग्य डावपेच टाकले आणि भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. मागील १५ वर्षांतील ही भारताची चौथी निचांक खेळी ठरली. यानंतर मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला रवींद्र जडेजाने धक्का दिला. त्याने पहिली विकेट घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५००व्या विकेटचा टप्पा ओलांडला. त्याने आणखी एक विकेट घेतली असती, परंतु चुकीचा फटका बसला.  भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा दोन वेळा बाद होता, परंतु DRS न घेतल्याने तो मैदानावार टीकला. रोहित जलदगती गोलंदाजांना सहज खेळून काढतोय असे दिसत असताना स्मिथने फिरकीपटूंना गोलंदाजीला आणले आणि सहाव्या षटकात विकेट मिळाली. मॅथ्यू कुहनेमनच्या गोलंदाजीवर रोहित फटका मारण्यासाठी पुढे आला अन् केरीने त्याला यष्टीचित केले. रोहित १२ धावांवर बाद झाला. शुबमन गिल ( २१) याचीही विकेट पुढील षटकात कुहनेमननेच घेतली. चेतेश्वर पुजारा ( १) व श्रेयस अय्यर ( ०) हेही माघारी परतले.  

विराट व भरत यांनी १० षटकं खेळून काढतान २५ धावांची भागीदारी केली, परंतु टॉड मर्फीनं ही जोडी तोडली. विराट ५२ चेंडूंत २२ धावांवर LBW झाला. बघता बघता भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. विराटने सर्वाधिक २२, गिलने २१ आणि केएस भरतने १७ धावा केल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली.

ट्रॅव्हीस हेड व उस्मान ख्वाज यांनी सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु रवींद्र जडेजाने धक्का दिला. सहाव्या षटकात जडेजाने ऑसी सलामीवीराला ( ९) पायचीत केले. त्याच षटकात जडेजाने मार्नस लाबुशेनची विकेट मिळवली होती. लाबुशेनचा फटका चुकला अन् चेंडू बॅटला लागून यष्टींवर आदळला. लाबूशेन बाहेर जात असताना अम्पायरने नो बॉलचा इशारा दिला. त्या षटकातील जडेजाचा हा दुसरा नो बॉल होता आणि फिरकीपटू नो बॉल टाकत असल्याने समालोचन करणारे रवी शास्त्री व सुनील गावस्कर संतापले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजा
Open in App