Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 1st Test : मैदानात कोहलीचा बॉलिवूड स्टाईल डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावाच्यावेळी विराट क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी विराटने झकास डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 15:22 IST

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा विराट कोहली हा चांगलाच चर्चेत राहीला. कारण तिसऱ्या दिवशी विराटवर टीका झाली, त्याने माफी मागितली, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्याच्या हजार धावा पूर्ण झाल्या, पण विराट अजून एका गोष्टीसाठी शनिवारी चर्चेत राहीला. शनिवारी विराटने मैदानात बॉलिवूड स्टाइलमध्ये डान्स केला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावाच्यावेळी विराट क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी विराटने झकास डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

पाहा विराटच्या डान्सचा व्हिडीओ

तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकडपहिल्या डावात शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा दुसरा डाव सारवला होता. पण मोक्याच्या क्षणी विराट बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. पण विराट बाद झाला असला तरी भारताने सामन्यावर चांगली पकड बनवली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण 166 धावांची आघाडी आहे. पुजारा तिसऱ्या दिवशी नाबाद असून त्याने 127 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 40 धावा केल्या आहेत. कोहली आणि पुजारा यांनी दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने कोहलीचा काढला. कोहलीने 104 चेंडूंत 3 चौकारांच्या जोरावर 34 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी दिल्या कोहलीला कानपिचक्याभारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक आहे. पण त्याचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत. 

होय मी चुकलो, सांगतोय विराट कोहलीभारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक समजला जातो. त्याचबरोबर तो कधीही आपल्या चुका मान्य करत नाही. पण कोहलीने मात्र आपली चुक मान्य केली आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने मी चुकलो, पण त्या चुकीचे मला शल्य वाटत नाही, असे कोहली म्हणाला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया