Join us

Ind vs Aus 1st test live : रवी शास्त्रींना तोड नाही! लाईव्ह सामन्यात ऑस्ट्रेलियन दिग्गजावर शाब्दीक मारा, झाला कावराबावरा

India vs Australia 1st test live score updates : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 ( Border-Gavskar Trophy) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 09:58 IST

Open in App

India vs Australia 1st test live score updates : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 ( Border-Gavskar Trophy) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू झाली आहे. पहिल्या सामन्याचा पहिला दिवस भारतीयांनी गाजवला. रवींद्र जडेजाने पाच, तर आर अश्विनने तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारताने दिवसअखेर १ बाद ७७ धावा केल्या. पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कॉमेंट्री बॉक्समध्ये माजी ऑस्ट्रेलियन मार्क वॉ याची खिल्ली उडवताना दिसले. मार्कला त्याच्या २०२१ मध्ये केलेल्या भविष्यवाणीची आठवण करून देताना शास्त्रींनी शाळा घेतली. Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match

रवींद्र जडेजा अडचणीत? Viral Video नंतर मॅच रेफरींकडून चौकशी, रोहित शर्माकडेही विचारणा 

२०२१ मध्ये भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्याचवेळी टीम इंडियाचा डाव ३६ धावांत गुंडाळला गेला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मार्क वॉने टीम इंडिया ०-४ ने हरणार असल्याची भविष्यवाणी केली होती. त्याचवेळी रवी शास्त्रींनी त्याच्या भविष्यवाणीची आठवण करून देत खिल्ली उडवली. कारण टीम इंडियाने ती मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले होते. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

रवी शास्त्री यांनी वॉला सांगितले की, भारतीय संघ केवळ ३६ धावांवर ऑल आऊट झाला तेव्हा भारत ०-४ असा पराभव पत्करेल असा अंदाज तुम्हाला आठवतो का? त्यानंतर मार्क वॉ हसला आणि म्हणाला की, मी एकटाच नाही ज्याने हे भाकीत केले होते.    Ind vs aus scorecard  दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १७७ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने डावाची सुरुवात आक्रमक फटकेबाजीने केली. त्याने पहिल्या षटकात तीन चौकार खेचले. नॅथन लियॉनने पुढे येत षटकार खेचून त्याने  कसोटीतील २५०वा सिक्स मारला. रोहित व लोकेश यांनी २३ षटकं खेळून काढताना ७६ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला ८ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवली. पदार्पणवीर टॉड मर्फीने स्वतःच्याच गोलंदाजीवर लोकेश राहुलची ( २०) विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ७७ धावा केल्या होत्या. Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवी शास्त्री
Open in App