Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाची 'भारी' खेळी, काही कळण्याआधी स्टीव्ह स्मिथची गुल झाली 'दांडी', Video
Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाची 'भारी' खेळी, काही कळण्याआधी स्टीव्ह स्मिथची गुल झाली 'दांडी', Video
India vs Australia 1st test live score updates : लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद केले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:23 IST
Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाची 'भारी' खेळी, काही कळण्याआधी स्टीव्ह स्मिथची गुल झाली 'दांडी', Video
India vs Australia 1st test live score updates : मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ धावा अशी दयनीय केली. पण, अनुभवी स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी यजमानांना चोख प्रत्युत्तर दिले. लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद केले. पदार्पणवीर केएस भरतने ( KS Bharat) अप्रतिम स्टम्पिंग केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला एका अप्रतिम चेंडूवर जडेजाने त्रिफळाचीत करून माघारी पाठवले.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले. मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी ऑसींचा डाव सारवला. स्मिथ व लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला २ बाद ७६ धावा उभारून दिल्या. स्मिथ ७४ चेंडूंत १९ आणि लाबुशेन ११० चेंडूंत ४७ धावांवर खेळत होता. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here )
पण, लंच ब्रेकनंतर लाबुशेनला २ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजाच्या फिरकीवर तो यष्टीचीत झाला. भरतने यष्टींमागे सुरेख कामगिरी केली. त्यापाठोपाठ मॅट शेनशॉ LBW झाला. जडेजाची हॅटट्रिक मात्र हुकली. स्मिथने अचानक आक्रमक खेळ सुरू केला आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चांगले फटके खेचले. स्मिथ फिरकी चेंडूला चांगलं खेळताना दिसल्याने जडेजाने डाव खेळला. त्याने वळणारा चेंडू न टाकता सरळ टाकला. चेंडू वळेल या आशेवर स्मिथ फटका मारायला गेला अन् बॅट-पॅडमधून चेंडू सरळ यष्टींवर आदळला. स्मिथ १०७ चेंडूंत ३७ धावा करून माघारी परतला आणि ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद १०९ धावा झाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"