Join us

IND vs AUS 1st Test : इशांत शर्माच्या एका चुकीमुळे फिंचला मिळाले जीवदान

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ उतरला तेव्हा त्यांचा सलामीवीर आरोन फिंच दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला असता, पण यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची एक चुक संघाला भोवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 12:02 IST

Open in App
ठळक मुद्देइशांत शर्माच्या दुसऱ्याच चेंडूवर फिंच पायचीत झाला होता. त्यावेळी भारतीय संघांने जोरदार अपील केलीपंचांनीही त्याला बाद ठरवले. पण तो अखेर नाबाद राहीला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिला कसोटी सामना चांगलाच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ उतरला तेव्हा त्यांचा सलामीवीर आरोन फिंच दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला असता, पण यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची एक चुक संघाला भोवली.

इशांत शर्माच्या दुसऱ्याच चेंडूवर फिंच पायचीत झाला होता. त्यावेळी भारतीय संघांने जोरदार अपील केली आणि पंचांनीही त्याला बाद ठरवले. हा चेंडू पॅडवर थोडा वर लागल्यामुळे फिंचने यावेळी डीआरएस मागितला. त्यावेळी हा चेंडू स्टम्पवर लागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मैदानावरील पंचांच्या निर्णयानुसार तो बाद ठरत होता. पण यावेळी इशांतची एक चुक भारताला भोवली. कारण इशांतने त्यावेळी नो बॉल टाकला होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी फिंचला नाबाद ठरवले. फिंच त्यानंतर 11 धावांवर असताना बाद झाला. फिंचला आर. अश्विनने तंबूचा रस्ता दाखवला.

नेमकं काय घडलं, पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :इशांत शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया