Join us

Video : २ भोपळे नावावर, त्यात तू...; Rohit Sharma निर्णयावर नाराज, अम्पायरला सवाल

India vs Afghanistan T20I Live   ( Marathi News ) : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताची सुरुवात काही खास झालेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:18 IST

Open in App

India vs Afghanistan T20I Live  ( Marathi News ) : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताची सुरुवात काही खास झालेली नाही. यशस्वी जैस्वाल ( ४) तिसऱ्या षटकात उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. फरीद अहदमने पुढच्याच षटकात विराट कोहलीला गोल्डन डकवर माघारी पाठवून भारताची अवस्था २ बाद १८ अशी केली. पण, पहिल्या षटकात रोहित शर्माने अम्पायरला मैदानवार थेट सवाल विचारल्याचे दिसले. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने मालिकेतील दोन सामने जिंकून २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात अक्षर पटेल, जितेश शर्मा व अर्शदीप सिंग यांच्याजागी संजू सॅमसन, आवेश खान व कुलदीप यादव यांना आज संधी दिली गेली आहे. अफगाणिस्तानचा नजिबुल्लाह जादरान याचा हा १०० वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना आहे आणि अफगाणिस्तानकडून असा पराक्रम करणारा तो मोहम्मद नबीनंतर ( ११५) दुसरा खेळाडू आहे. दोन्ही सामन्यांत भोपळ्यावर बाद झालेला रोहित आज थोडा दडपणात खेळताना दिसला... पहिल्या षटकात ५ चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही.

फरीद अहमदच्या पहिल्या चेंडूवर यशस्वीने बॅकफूटवर जाऊन फटका मारला आणि ३ धावा काढल्या. दुसऱ्या चेंडूवर रोहितने बॅट फिरवली अन् चेंडू डाव्या बाजूने सीमारेषेबाहेर गेला. अम्पायर विरेंदर सिंगने हा लेग बाय दिला आणि रोहित नाराज झाला. षटक संपल्यानंतर तो त्यांना म्हणालाही, वीरू बॅट को बॉल लगा था और तुने लेग बाय दिया... यावर दोघंही नंतर हसले. पाचवा चेंडूही त्याच दिशेने चौकार गेला, परंतु यावेळी थायपॅडला तो लागला होता. रोहितने ७व्या चेंडूवर पहिली धाव घेतली. 

 

भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, संजू सॅमसन, शिवम दुबे, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, रिंकू सिंग

अफगाणिस्तानचा संघ - इब्राहिम जादरान, रहमनुल्लाह गुरबाज, गुलबदीन नईम, अझमतुल्लाह ओमारजई, मोहम्मद नबी, अजिबुल्लाह जादरान, करिम जनत, शराफुद्दीन अश्रफ, क्वैस अहमद, मोहम्मद सलीम सफी, फरीद अहमद मलिक  

 

टॅग्स :भारत-अफगाणिस्तानरोहित शर्मायशस्वी जैस्वालविराट कोहली