Join us

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यात झाला 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर... पाहा व्हिडीओ

भारताच्या चाहत्यांनी चक्क 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर सुरु केला आणि या घोषणेने संपूर्ण मैदान निनादून गेले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 18:56 IST

Open in App
ठळक मुद्देपाकिस्तानचे चाहते घोषणा देण्यात रंगात आले होते. 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा ते देत होते. त्यावेळी भारताच्या चाहत्यांनी 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर सुरु केला

दुबई, आशिया चषक 2018 भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर सामना असेल तर दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये मैदानात घोषणा देण्याची चढाओढ सुरु असते. दुबईतील बुधवारच्या सामन्यातही अशीच चढाओढ पाहायला मिळाली. त्यावेळी भारताच्या चाहत्यांनी चक्क 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर सुरु केला आणि या घोषणेने संपूर्ण मैदान निनादून गेले.

पाकिस्तानचे चाहते घोषणा देण्यात रंगात आले होते. 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा ते देत होते. त्यावेळी भारताच्या चाहत्यांनी 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर सुरु केला आणि स्टेडियममध्ये बाप्पाचा हा गजर चांगलाच घुमला.

'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर सुरु असताना काढलेला हा व्हिडीओ

टॅग्स :आशिया चषकगणपतीभारत विरुद्ध पाकिस्तान