Join us

IND vs PAK सामन्यात पावसाचा खेळ रंगणार! काय सांगतोय हवामानाचा अंदाज?

भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज न्यूयॉर्कच्या मैदानावर भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:25 IST

Open in App

IND vs PAK Weather LIVE updates:  भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज न्यूयॉर्कच्या मैदानावर भिडणार आहेत. आतापर्यंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ७ वेळा उभय संघ समोरासमोर आले आणि टीम इंडियाने ६-१ अशी बाजी मारली आहे. पाकिस्तानचा फॉर्म यंदा खूपच खराब आहे आणि त्यामुळे आजचा सामना भारतीय संघ सहज जिंकेल असा अंदाज आहे. काल दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्या लढतीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरह IND vs PAK सामना होणार आहे. त्यामुळे धावांचा डोंगर पाहायला मिळणे थोडे अवघड वाटत आहे, त्यात पावसाचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागच्या वेळेस जेव्हा उभय संघ एकमेकांना भिडले होते, तेव्हा चाहत्यांना विराट कोहलीची अविस्मरणीय खेळी पाहायला मिळाली होती. विराटने एकहाती पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली होती. आजच्या सामन्यातही विराटवर साऱ्यांच्या नजरा खिळणार आहेत, परंतु कर्णधार रोहित शर्माला फक्त विराटवर अवलंबून राहायचं नाही आणि त्यामुळेच त्याने संघातील सर्व सदस्यांना योगदान देण्याचे आवाहन केले आहे. तेच दुसरीकडे अमेरिका संघाकडून हार पत्करावी लागल्याने पाकिस्तानचे मनोबल खचले आहे आणि त्यांना पुनरागमनासाठी प्रचंड इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याची तयारी पूर्ण झाली असली तरी या सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. Accuweather नुसार सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता पावसाची ५१ टक्के शक्यता आहे. म्हणजेच सामना सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार पावसामुळे सामना खंडित होण्याची शक्यता असली तरी चाहत्यांना २० षटकांचा संपूर्ण सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तान