‘पंतने आपल्या नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे आणि त्यात कोणताही बदल करु नये. मात्र हे करत असताना त्याने परिस्थिती ओळखून संघाच्या हितासाठी फटक्यांची योग्य निवड करुन खेळले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने दिली.
भारतीय संघाने ७९ धावांत ४ बळी गमावल्यानंतर पुजारा-पंत यांनी पाचव्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. पुजाराने म्हटले की, ‘आक्रमकता पंतचा नैसर्गिक खेळ आहे. त्यामुळे आम्ही त्याला फारवेळ रोखू शकत नाही. तो फार बचावात्मक नाही खेळू शकत, कारण यामुळे कदाचित तो लवकर बाद होईल. त्याने आक्रमक फटके खेळत राहणे, हे त्याच्यासाठी चांगलेच आहे. परंतु, हे करत असताना त्याने विचार करुन फटक्यांची निवड करावी.’
पुजार पुढे म्हणाला की, ‘पंतसारखे गुणवान खेळाडू आपल्या चुकांमधून नक्कीच शिकतील. पंतही यातून शिकेल. कोणता फटका कधी खेळावा, हे त्याने शिकले पाहिजे. परिस्थितीनुसार त्याची खेळपट्टीवर कधी गरज लागणार, हे पंतने समजून घ्यायला हवे.’