क्वालालम्पूर : नेपाळकडून पराभूत झाल्यानंतर गतविजेता भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ‘करा किंवा मरा’ या सामन्यात बांगलादेशकडूनही आठ गड्यांनी पराभूत होताच आशिया चषक स्पर्धेबाहेर पडला. तीन दिवसांत भारताचा हा दुसरा पराभव होता.
पावसामुळे ३२ षटकांचा सामना खेळविण्यात आला.भारताने प्रथम फलंदाजी करीत ८ बाद १८७ धावा उभारल्या. बांगलादेशने चार षटके शिल्लक राखून २ बाद १९१ धावा करीत सामना जिंकला.
भारत पराभूत झाल्याने नेपाळ व बांगलादेशने उपांत्य फेरीत धडक दिली. ब गटातून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.
पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाºया विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताने स्पर्धेत नव्या दमाचे खेळाडू पाठविले होते. (वृत्तसंस्था)