Join us  

पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली म्हणून...! भारतीय फलंदाजाची पकडली अजब कॅच, Video 

India vs Pakistan - भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाला आशिया चषक स्पर्धेत रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 4:37 PM

Open in App

India vs Pakistan - भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाला आशिया चषक स्पर्धेत रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. भारत-पाकिस्तान म्हटलं क्रिकेट चाहत्यांचा उत्साह नेहमी शिगेला पोहोचलेला असतो. कालच्या सामन्यातही ती उत्सुकता दिसली, परंतु यावेळी पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली. त्यामुळे भारताचा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या. सलामीवीर आदर्श सिंग ( ६२), कर्णधार उदय सहरान ( ६० ) आणि सचिन धस ( ५८) यांनी अर्धशतक झळकावले. पाकिस्तानच्या अझान अवैसच्या नाबाद शतकाने विजय पक्का केला.  

या सामन्यात एक विचित्र कॅच पाहायला मिळाली. भारताच्या डावातील ३२व्या षटकात आदर्श सिंग बाद झाला. पाकिस्तानचा फिरकीपटू अराफत मिन्हासने टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा आदर्शने प्रयत्न केला आणि तो चेंडू कट लागून यष्टिरक्षकाकडे गेला. यष्टिरक्षक साद बैग याच्या पॅडमध्ये जाऊन चेंडू अडकला आणि झेलचे अपील झाले. अम्पायरने भारतीय फलंदाजाला बाद दिले.  

पाकिस्तानकडून साहजैब खान ( ६३) व अझान अवैस यांनी ११० धावांची केलेली भागीदारी महत्त्वाची ठरली. कर्णधार साद बैगने अझानसह पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अझान १३० चेंडूंत १० चौकारांसह १०५ धावांवर नाबाद राहिला, तर बैगनेही ५१ चेंडूंत नाबाद ६८ धावा केल्या. पाकिस्तानने ४७ षटकांत २ बाद २६३ धावा केल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2023