Aaron George, Vaibhav Suryavanshi Power India To Final With Record Chase : एरॉन जॉर्जचं दमदार शतक आणि वैभव सूर्यवंशीसह कर्णधार आयुष म्हात्रेच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने U19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्ताला ७ विकेट्सनी पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघ दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. यंदाच्या हंगामात जेतेपदाचा 'षटकार' मारण्यासाठी आता फायनलमध्ये युवा टीम इंडिया इंग्लंडच्या U19 संघाला संघाला भिडणार आहे. भारतीय संघाने विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना ४२ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीचे स्फोटक अर्धशतक
पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने फैजल खान ११० (९३) आणि उझैरुल्लाह नियाझाई १०१ (८६) या दोघांच्या शतकाच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ४ बाद ३१० धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा ३११ धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशी ३३ चेंडूत ६८ धावा करून परतल्यावर कर्णधार आयुष म्हात्रेनं दमदार अर्धशतक झळकावले.
U 19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीचे वादळी अर्धशतक! ३०० पारच्या लढाईत षटकार-चौकारांची 'बरसात' अन्....
मग आयुष म्हात्रे अन् एरॉन जॉर्ज जोडी जमली
कर्णधार आयुष म्हात्रे आणि एरॉन जॉर्ज या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०१ चेंडूत ११४ धावांची भागीदारी रचत अफगाणिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडले. आय़ुष म्हात्रेनं ५९ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची दमदार खेळी केली.
जॉर्जच शतक अन् टीम इंडियानं दिमाखात गाठली फायनल
तो माघारी फिरल्यावरही एरॉन याने आपली खेळी कायम ठेवत शतक साजरे केले. विहान मल्होत्राच्या साथीनं ७९ चेंडूत ९६ धावांची आणखी एक दमदार भागीदारी रचताना एरॉन जॉर्जनं १५ चौकारआणि २ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची खेळी केली. विहान मल्होत्रानं ४७ चेंडूत ३८ धावांची नाबाद खेळी करत वेदांद त्रिवेदीच्या साथीनं संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.