भारताला दक्षिण आफ्रिका दौरा अवघड जाणार; यजमानांनी बदलला कर्णधार, तगड्या संघांची घोषणा 

India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर ट्वेंटी-२० मालिकेत १-४ असे पराभूत केल्यानंतर भारतीय संघ या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दोऱ्यासाठी रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 01:19 PM2023-12-04T13:19:06+5:302023-12-04T13:19:26+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of South Africa : South Africa announced their squads for the upcoming all-format series India | भारताला दक्षिण आफ्रिका दौरा अवघड जाणार; यजमानांनी बदलला कर्णधार, तगड्या संघांची घोषणा 

भारताला दक्षिण आफ्रिका दौरा अवघड जाणार; यजमानांनी बदलला कर्णधार, तगड्या संघांची घोषणा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर ट्वेंटी-२० मालिकेत १-४ असे पराभूत केल्यानंतर भारतीय संघ या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दोऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२०, लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली वन डे व रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळणार आहे. भारतासाठी दक्षिण आफ्रिका दौरा नेहमीच आव्हानात्मक ठरला आहे आणि याहीवेळेस टीम इंडियाचा पाहुणचार करण्यासाठी यजमान सज्ज झाले आहेत. 


दक्षिण आफ्रिकेने १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी ३ फॉरमॅटसाठी तीन संघ जाहीर केले आहेत. एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली आफ्रिका ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत खेळेल, तर कसोटी मालिकेतील संघाचे नेतृत्व टेम्बा बवुमाकडे असणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टेम्बा बवुमाने नेतृत्व केले होते. पण, भारताविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. जलदगती गोलंदाज नांद्रे बर्गर व फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅम व त्रिस्तान स्टब्स यांना कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळणार आहे. यष्टिरक्षक कायले वेरेयने याचेही पुनरागमन झाले आहे.
 
दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० संघ - एडन मार्कराम ( कर्णधार), ऑटनिएल बार्टमन, मॅथ्यू ब्रित्झके, नांद्रे बर्गनर, गेराल्ड कोएत्झी ( पहिल्या व दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी), डोनोव्हॅन फेरेरा, रिझा हेंड्रीक्स, मार्को यानसेन ( पहिल्या व दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी), हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी ( पहिल्या व दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी), एंडिले फेहलुकवायो, तब्रेझ शम्सी, त्रिस्तान स्टब्स व लिझाड विलियम्स 


दक्षिण आफ्रिका वन डे संघ - एडन मार्कराम ( कर्णधार), ऑटनिएल बार्टमन, नांद्रे बर्गर, टॉनी डे झोर्झी, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयन्ने, लिझाड विलियम्स 


दक्षिण आफ्रिका कसोटी संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, टॉनी डे झॉर्झी, डीन एल्गर, मार्को यानसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, किगन पीटरसन, कागिसो रबाडा, त्रिस्तान स्टब्स, कायले वेरेयन्ने  


ट्वेंटी-२० मालिका 

१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून
१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून

वन डे मालिका
१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून
१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 
२१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून

कसोटी मालिका
२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून
३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून

 

 

Web Title: India Tour of South Africa : South Africa announced their squads for the upcoming all-format series India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.