Join us

माशी शिंकली! इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच टॉप फलंदाजाने माघार घेतली, रोहित शर्माची डोकेदुखी वाढली

India Tour of England : बदली खेळाडू अद्याप जाहीर केला गेला नसला तरी मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:27 IST

Open in App

India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ गुरुवारी तेथे दाखल झाला. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे सीनियर खेळाडू विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसले... पण, या मालिकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकेश राहुल ( KL Rahul) याला मात्र दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.  BCCI ने लोकेश राहुलला उपचारासाठी जर्मनीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी ३० वर्षीय लोकेशच्या दुखापतीने डोकं वर काढलं होतं. त्यामुळे त्याने पहिल्या लढतीआधीच माघार घेतली.  

''होय लोकेश राहुलच्या फिटनेससाठी बीसीसीआय प्रयत्न करतेय आणि तो लवकरच जर्मनीत जाईल,''असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी Cricbuzz शी बोलताना सांगितले. या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकेश राहुल जर्मनीसाठी रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ एक कसोटी ( १ ते ५ जुलै), तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात लोकेशकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. लोकेशच्या बदली खेळाडू अद्याप जाहीर केला गेला नसला तरी मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

लोकेश राहुलची दुखापतीची टाईमलाईन 

  • नोव्हेंबर २०२० - मांडीच्या स्नायूंना दुखापत, लोकेश राहुलला या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार
  • फेब्रुवारी २०२१- हॅमस्ट्रिंग मुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून माघार
  • फेब्रुवारी २०२१ - हॅमस्ट्रिंगमुळे श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकला नाही
  • मार्च २०२१- हॅमस्ट्रिंगमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार

  

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून  भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै  पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन इंग्लंडविरुद्धच्या  सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मालोकेश राहुल
Open in App