India Tour of England: १०२४ कोटींचा प्रश्न..., भारत-इंग्लंड मालिकेसंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय!

India Tour of England: पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरुवात व्हायच्या दोन दिवसआधी इंग्लंडचे तीन खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील ४ सदस्य यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 03:30 PM2021-07-08T15:30:13+5:302021-07-08T15:30:53+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of England: With $137 Million on line, ECB making strict bio-bubble plans for England & India teams | India Tour of England: १०२४ कोटींचा प्रश्न..., भारत-इंग्लंड मालिकेसंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय!

India Tour of England: १०२४ कोटींचा प्रश्न..., भारत-इंग्लंड मालिकेसंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला होणार सुरूवात

India Tour of England: पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरुवात व्हायच्या दोन दिवसआधी इंग्लंडचे तीन खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील ४ सदस्य यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पाकिस्तान मालिकेसाठी निवडलेल्या संपूर्ण संघाला विलगिकरणात जावे लागले. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) तातडीनं १८ सदस्यीय नवा संघ जाहीर केला अन् आज पहिला वन डे सामना खेळवला जाणार आहे. पण, या घटनेमुळे ECBची झोप उडाली आहे. त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेची चिंता नाही, तर पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची चिंता आहे. कारण १३७ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १०२४ कोटी १३, ६६, ५०० रुपयांचा प्रश्न आहे.( ECB’s worries is almost $137 million is riding on the 5 match test series between Virat Kohli’s India vs Joe Root’s England)

IND vs ENG 2021 : विराट कोहली, रवी शास्त्री यांना झटका; निवड समितीनं अमान्य केली त्यांची मागणी

त्यामुळेच ECBनं भारत-इंग्लंड मालिकेपूर्वी कोरोना लसीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या काही दिवसांत भारतीय खेळाडूंना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला. असा प्रसंग भारताविरुद्धच्या मालिकेत घडू नये याकरिता इंग्लंडनं कंबर कसली आहे. त्यांनी बायो-बबल नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ( What measures ECB will take?)

मोठी बातमी : MS Dhoni आयपीएल २०२२त खेळणार की नाही?; चेन्नई सुपर किंग्सची महत्त्वाची घोषणा

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही संघातील खेळाडूंना कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचा ECBचा प्रयत्न आहे. ब्रॉडकास्टींग, कमर्शीयल आणि तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न अशा एकूण १३७ मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. त्यामुळे ही मालिका रद्द होणे किंवा स्थगित होणे ECBला महागात पडू शकते. या मालिकेत बदल करण्याचा कालावधीच ECBला मिळणार नाही. या मालिकेनंतर लगेचच आयपीएल २०२१च्या उर्वरित ३१ सामन्यांना यूएईत सुरूवात होत आहे आणि आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू थेट लंडनहून यूएईत जाणार आहेत.


विराट कोहली अँड टीम सध्या २० दिवसांच्या सुट्टीवर आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर टीम इंडियाचे खेळाडू व त्यांचे कुटुंबीय लंडनमध्ये भटकंती करताना दिसत आहेत. पुढील आठवड्यात हे खेळाडू डरहॅम येथे होणाऱ्या सराव सामन्यासाठी प्रवास करतील. या सर्व खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस भारतातच घेतला होता आणि आता पुढील आठवड्यात त्यांना इथे दुसरा डोस दिला जाईल. 

Web Title: India Tour of England: With $137 Million on line, ECB making strict bio-bubble plans for England & India teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.