Join us  

India Tour of Australia : IPL 2020 फायनलसाठी 'फिट' रोहित शर्मा वन डे व ट्वेंटी-20 मालिका का खेळणार नाही?; BCCI म्हणते... 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या कसोटी संघात अखेर रोहित शर्माची ( Rohit Sharma) निवड झाली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला रोहित Indian Premier League मध्ये पुढील चार सामने खेळला नव्हता.

By स्वदेश घाणेकर | Published: November 09, 2020 5:57 PM

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या कसोटी संघात अखेर रोहित शर्माची ( Rohit Sharma) निवड झाली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला रोहित Indian Premier League मध्ये पुढील चार सामने खेळला नव्हता. त्याच दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे, ट्वेंटी-20 व कसोटी संघ जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे त्यापैकी एकाही संघात रोहितचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. BCCIनं अनफिट रोहितला वगळल्यानंतर मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) रोहितचा सराव करतानाचा 45 मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यामुळे BCCI व MI यांच्यात काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली अन् ती अजूनही सुरूच आहे.

आज बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंदर्भात मोठे अपडेट दिले. कर्णधार विराट कोहली अनुष्काच्या बाळंतपणासाठी पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परणार आहे. बीसीसीआयनं त्याची पितृत्व रजा मान्य केली, त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांत अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळेल. सर्वांना उत्सुकता होती ती रोहित शर्माच्या समावेशाची. बीसीसीआयनं अखेरीस कसोटी मालिकेसाठी रोहितची निवड केली. पण, त्याचवेळी रोहितला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती दिल्याचे सांगून BCCIनं नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत BCCI म्हणते, मेडिकल टीम रोहित शर्माच्या फिटनेसवर लक्ष ठेऊन आहे आणि निवड समितीला ते अपडेट्स देत आहेत. रोहित शर्माशी सल्लामसलत केल्यानंतर वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या कालावधीत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी वेळ मिळेल. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश केला गेला आहे.

बीसीसीआयच्या या स्टेटमेंटनुसार रोहित अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे IPL 2020च्या अंतिम सामन्यासाठी फिट असलेला रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी फिट नाही का, असा सवाल केला जात आहे.  

सुधारित संघ ( Revised Indian Squad)  

ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून          ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीमुंबई इंडियन्सIPL 2020