Join us  

India Tour of Australia : टीम इंडियाचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलपासून काही अंतरावर कोसळलं विमान 

भारतीय संघ सध्या सिडनी येथील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे आणि हॉटेलपासून काही अंतरावर शनिवारी विमान कोसळले.

By स्वदेश घाणेकर | Published: November 15, 2020 12:31 PM

Open in App

टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. क्वारंटाईऩ कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी शनिवारी सरावाला सुरुवातही केली. BCCIनं टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. भारतीय संघ सध्या सिडनी येथील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे आणि हॉटेलपासून 30 किमी अंतरावर शनिवारी विमान कोसळले. क्रोमेर पार्क येथील मैदानावर हे विमान कोसळले आणि त्यावेळी तेथे उपस्थित खेळाडूंची पळापळ झाली. स्थानिक खेळाडू तेथे फुटबॉल व क्रिकेट खेळत होते. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता ही घटना घडली.

विमानाचं इंजिन बंद पडलं आणि प्लेन खाली कोसळलं. मैदानावर उपस्थित असलेल्या खेळाडूंनी लगेच मैदान सोडले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दोन चालकांना किरकोळ दुखापत झाली. क्रोमेर क्रिकेट क्लबचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग रॉलिन्स यांनीही लगेच खेळाडूंना मैदानाबाहेर केल्याची माहिती दिली.  

 ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका ही नेहमीच चाहत्यांच्या पसंतीत उतरणारी गोष्ट... ऑसी खेळाडूंची स्लेजिंग अन् भारतीय खेळाडूंचं त्यात तोडीचं उत्तर, यांनी नेहमीच चर्चेला विषय दिला. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या या दौऱ्यावर भारतीय संघाकडून सर्वांना प्रचंड अपेक्षा आहेत. 

सुधारित संघ ( Revised Team For Australia Tour )ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून          ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया