Join us

India Tour of Australia : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूना केलं 'एअरलिफ्ट'; २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेचं काय होणार?

१० डिसेंबरपासून बिग बॅश लीगला सुरुवात होणार आहे आणि अॅडलेडमध्ये २८ डिसेंबरपर्यंत BBLचा एकही सामना होणार नाही, तरीही सावधगिरी म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 17, 2020 17:39 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाच्या वन डे व ट्वेंटी-20 संघाचे सदस्य असलेल्या आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, तस्मानिया आणि क्विन्सलँड येथे अडकलेल्या खेळाडू व स्टाफ सदस्यांना मंगळवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एअऱलिफ्ट करून सिडनीत आणले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या तीनही राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत आता कोणताच खंड पडणार नाही.  

बिग बॅश लीगमधील अॅडलेड स्ट्रायकर्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातील खेळाडूंचे ट्रेनिंग बेसही हलवण्यात आले आहे. १० डिसेंबरपासून बिग बॅश लीगला सुरुवात होणार आहे आणि अॅडलेडमध्ये २८ डिसेंबरपर्यंत BBLचा एकही सामना होणार नाही, तरीही सावधगिरी म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे. ''क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मागील २४ तासांत अनेक खेळाडूंना अॅडलेडमधून हलवले आहे. खेळाडू व स्टाफ सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार,''अशी प्रतिक्रिया क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी सीईओ निक हॉकली यांनी दिली.भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून          ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

भारतीय संघ ट्वेंटी-20 संघ - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचे संघकसोटी संघ  - डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन ( कर्णधार व यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन.  वन डे व ट्वेंटी-20 संघ - आरोन फिंच ( कर्णधार), सीन अबॉट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, मोईसेस हेन्रीक्स. मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनिएल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरोना वायरस बातम्याआॅस्ट्रेलिया