पाकिस्तानात न खेळण्यासाठी भारताकडून श्रीलंकन खेळाडूंवर दबाव; पाक मंत्र्याचा अजब दावा

ट्वेंटी -20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि वन डे संघाचा कर्णधार दिमुख करुणारत्ने यांच्यासह श्रीलंकेच्या दहा प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 14:54 IST2019-09-10T14:53:39+5:302019-09-10T14:54:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India threatened to boycott SL players from IPL if they didn’t pull out of Pak tour, claims Fawad Chaudhry | पाकिस्तानात न खेळण्यासाठी भारताकडून श्रीलंकन खेळाडूंवर दबाव; पाक मंत्र्याचा अजब दावा

पाकिस्तानात न खेळण्यासाठी भारताकडून श्रीलंकन खेळाडूंवर दबाव; पाक मंत्र्याचा अजब दावा

कोलंबो : ट्वेंटी -20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि वन डे संघाचा कर्णधार दिमुख करुणारत्ने यांच्यासह श्रीलंकेच्या दहा प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. श्रीलंकन खेळाडूंच्या या निर्णयामागे भारताचा हात असल्याचा अजब दावा पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन यांनी केला आहे.

श्रीलंका क्रिकेट संघ 27 सप्टेंबरपासून तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मलिंगा व करुणारत्नेसह थिसारा परेरा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशॅन डिकवेला, कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल आणि दिनेश चंडिमल यांनीही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. मार्च 2009च्या हल्ल्यानंतर श्रीलंकन संघ 2017मध्ये लाहोर येथे एक ट्वेंटी-20 सामना खेळला होता. आताच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेनंतर श्रीलंका येथे दोन कसोटी सामने खेळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेने 2015मध्ये पाकिस्तानात वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळले होते आणि वेस्ट इंडिजही 2018मध्ये तीन ट्वेंटी-20 सामने खेळले होते. 

श्रीलंकेच्या खेळाडूंना हा निर्णय घेण्यासाठी भारताकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा हुसैन यांनी केला. त्यांनी ट्विट केले की,'' एका समालोचकाने मला सांगितले की, भारताकडून श्रीलंकेच्या खेळाडूंवर दबाव टाकला जात आहे. तुम्ही पाकिस्तानात खेळायला जात, तर तुम्हाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही, अशी धमकी लंकेच्या खेळाडूंना दिली जात आहे. हे पातळी सोडून वागणं आहे.'' 


 

Web Title: India threatened to boycott SL players from IPL if they didn’t pull out of Pak tour, claims Fawad Chaudhry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.