Join us

भारताने इंग्लंडच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला : चॅपेल

चॅपेल यांनी एका वेबसाइटवर लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले की, भारताने कसोटीमध्ये तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला. कारण चेन्नईत ज्यो रुट शिवाय एकही फलंदाज फिरकी विरोधात चांगला खेळू शकला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 04:43 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताने इंग्लंडच्या फिरकीविरोधातील कमकुवतपणाचा फायदा घेतला. त्यामुळे गुलाबी चेंडूचा हा सामना पाहुण्या संघाने दोन दिवसांतच गमावला, असे मत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे

चॅपेल यांनी म्हटले की, भारताने चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीविरोधात खेळण्याच्या इंग्लंडच्या कमकुवतपणा ओळखला आणि त्याचाच फायदा तिसऱ्या कसोटी सामन्यात घेतला आहे. अक्षर पटेल आणि अश्विन यांनी अनुक्रमे ११ आणि सात बळी घेतले, तर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ आणि दुसऱ्या डावात ८१ धावांवर बाद झाला. भारताने हा सामना १० गड्यांनी जिंकला.या आधी चेन्नईतील दुसरा कसोटी सामना भारताने ३१७ धावांनी जिंकला होता. या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने दोन डावात केवळ १३४ आणि १६४ धावा केल्या आहेत.त्यांनी पुढे म्हटले की, जेव्हा फिरकीच्या आव्हानाचा सामना करावा लागतो. तेव्हा इंग्लंडचे खेळाडू बचावात्मक खेळ करु शकत नाही. त्यामुळे ते भारतीय फिरकीपटूंविरोधात आक्रमक खेळ करतात ते क्रीजच्या बाहेर येऊन रिव्हर्स स्विपसारखे शॉट खेळतात हे याचे एक उदाहरण आहे. आधीच जोखमीचे शॉट खेळण्याची तयारी केल्याने फिरकीपटूला अस्थिर केले जाऊ शकते. ’

n चॅपेल यांनी एका वेबसाइटवर लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले की, भारताने कसोटीमध्ये तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला. कारण चेन्नईत ज्यो रुट शिवाय एकही फलंदाज फिरकी विरोधात चांगला खेळू शकला नव्हता. भारताने याचाच उपयोग करत इंग्लंडच्या खेळाडूंच्या मानसिकतेला प्रभावित केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड